आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या चित्रपटाच्या नावाचा लिफाफा देणाऱ्या पीडब्ल्यूसी अधिकाऱ्याला ऑस्करचे काम नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वश्रेष्ठ चित्रपटाच्या नावामुळे झालेल्या बडबडीसाठी अर्थविषयक सेवा देणारी संस्था “प्राइस व्हाटर हाऊस कूपर्स’ (पीडब्ल्यूसी)चे दोन अधिकारी  जबाबदार अाहेत. यातील एक अधिकारी तर गेल्या २० वर्षांपासून ऑस्कर पुरस्कार सोहळ्याशी जोडलेले आहेत. मात्र, आता या दोघांनाही अकादमी अवाॅर्डस समारंभांपासून दूर ठेवण्यात येणार आहे. 
 
या कामावरून दोघांनाही काढण्यात आले आहे. पीडब्ल्यूसीची व्यवस्थापकीय पार्टनर ब्रायन कुलिनन यांनी पुरस्कार प्रदान करण्यासाठी आलेले फाए डनअवे आणि वाॅरेन बीटी यांना व्यासपीठावर जाण्याआधी चुकीचा लिफाफा दिला होता. या चुकीमुळेच “मूनलाइट’च्या ऐवजी “ला ला लँड’ची सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून घोषणा करण्यात आली होती.  
 
कुलिनन यांची फक्त ही एकच चूक नसून त्या आधीदेखील त्यांनी चुका केल्या होत्या. डनअवे आणि बीटी ज्या वेळी व्यासपीठावर पुरस्काराच्या नावाची घोषणा करत होते, त्या आधीच त्यांनी व्यासपीठाच्या मागील बाजूचा एक फोटो ट्विट केला आणि त्यावर लिहिले होते, “बेस्ट अॅक्ट्रेस अॅमा स्टोन बॅकस्टेज’ या ट्विटच्या आधीही त्यांनी एक फोटो ट्विट करून ज्या ब्रीफकेसमध्ये पुरस्कारांचे लिफाफे ठेवलेले होते त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता.
 
इतकेच नाही तर पुरस्कारांची यादी घेऊन मी गुप्त मार्गाने जात असल्याचेही त्यावर लिहिले होते. या संबंधी वाद झाल्यानंतर त्यांनी हे सर्व ट्विट रद्द केले. प्राॅडक्शन टीमचा आणि या लिफाफ्यांचा काहीही संबंध नसतो, त्याला आम्ही हातदेखील लावत नसल्याचे अकादमी अवाॅर्ड्सचे प्रोड्युसर मायकेल डिलूका यांनी सांगितले.  
 
२.२३ लाख कर्मचारी आणि २.६ लाख कोटी रुपयांचा वार्षिक महसूल असलेली पीडब्ल्यूसी गेल्या ८३ वर्षांपासून अकादमी पुरस्कारासाठी काम करत आहे. या पुरस्कारांसाठी मतदान करून घेण्याची जबाबदारीदेखील त्यांच्याकडेच आहे. कुलिनन १९९७ पासून अकादमीसाठी काम करत आहेत. २०१४ मध्ये अकादमी पुरस्कारासाठी “को-बॅलटिंग लीडर’ म्हणून त्यांनी नियुक्ती झाली होती. मार्था रुइजदेखील २० वर्षांपासून पीडब्ल्यूसीसोबत काम करत असून २०१५ पासून अकादमी पुरस्काराचे काम करत आहे.  
 
अकादमीमध्ये सुमारे ६,२०० सदस्य असून त्यांच्या मतदानानंतरच पुरस्काराच्या विजेत्यांची निवड केली जाते. यामध्ये सर्वाधिक अमेरिकी आणि अर्ध चित्रपट निर्माते आहेत. लॉस एंजलिस टाइम्सच्या एका सर्वेक्षणात ऑस्कर पुरस्कारांची निवड करणाऱ्यांचे सरासरी वय ६३ वर्षे आहे. यामध्ये ७६ टक्के पुरुष आणि ९४ टक्के श्वेतवर्णीय आहेत.
बातम्या आणखी आहेत...