आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यात १३० तास काम करतात ‘याहू’च्या मारिसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - ‘याहू’ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मारिसा मायर या असमर्थ ठरल्या असल्याचे बोलले जात आहे. परंतु वैयक्तिक पातळीवर मारिसा यांच्या मेहनतीला कोणी नाकारत नाही. दीर्घकाळ काम करत राहण्याची त्यांची क्षमता इतर लोकांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. त्यामुळे “सिलिकॉन व्हॅली’मध्ये त्यांना सर्वात मेहनती सीईओ म्हटले जाते.

आठवड्यातील १६८ तासांत त्या जवळपास १३० तास काम करतात. म्हणजेच झोपण्यासह इतर कामांसाठी त्यांच्याकडे फक्त ३८ तास राहतात. वास्तविक पाहता इतर कार्यालयांमध्ये लोक आठ तास नोकरी करतात आणि आठवड्यातील पाच ते सहा कामांचे दिवस असतात. याचा विचार करता सामान्य लोकांच्या तुलनेत मारिसा प्रत्येक आठवड्यात तीन पट काम करतात. मागील वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयातून काम केले. त्यांची मातृत्वाची रजा एका महिन्याहून कमी होती. ‘याहू’मध्ये महिला कर्मचाऱ्यांना चार महिन्यांच्या सुटीचा नियम आहे. मारिसा २०१२ मध्ये पहिल्यांदा आई बनल्या तेव्हा त्या दोन आठवड्यातच कार्यालयात गेल्या होत्या. ‘याहू’ची स्थिती वाईट असल्याने सीईओ चार महिने सुटीवर जाणे शक्य नव्हते, असे मारिसा यांनी त्या वेळी म्हटले होते. दीर्घकाळ काम करण्याची मारिसा यांची सवय आजपासूनच नाही. ‘याहू’च्या अगोदर जेव्हा त्या गुगलमध्ये होत्या तेव्हा रात्री उशिरापर्यंत काम करायच्या. एका इंटरव्ह्यूमध्ये त्या म्हणाल्या की, ‘गुगल’च्या यशाची कहानी सर्वत्र सांगितली जाते, परंतु याच्या मागील कठीण परिश्रमाबद्दल कोणी बोलत नाही.
यश आणि अपयशात मेहनतीचे अंतर
मारिसा यांच्या मते, कठीण परिश्रम कुठल्याही व्यवसायाचे अविभाज्य अंग आहे. कोणत्याही यशस्वी आणि अपयशी स्टार्ट अपमध्ये हेच मोठे अंतर आहे. माझ्या पतीचे कार्यालय सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे, तेथे भरपूर स्टार्टअप्स आहेत. मी त्यांना पाहून सांगू शकते की यातील कोणता व्यवसाय यशस्वी होईल. ते स्टार्टअप कोण चालवत आहे. हे महत्त्वाचे नसून कामाचे वातावरण कसे आहे, यावर बरेचसे अवलंबून आहे.
बातम्या आणखी आहेत...