आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांनी दिली चिमुकल्‍याच्‍या हाती तलवार; सांगितले, आईचे शीर छाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच मुलाच्‍या हातात तलवार दिली होती. - Divya Marathi
याच मुलाच्‍या हातात तलवार दिली होती.
बेरुत – त्‍याचे वय अवघे चार वर्षे. पण, दहशहतवाद्यांनी त्‍याला जबदरस्‍ती उचनलून घेऊन गेले. त्‍यांनी त्‍याला अरबी भाषा शिकवली आणि शस्‍त्र चालवण्‍याचे प्रशिक्षणही दिले. एवढेच नाही तर त्‍याच्‍या कोवळ्या हातात तलवार देऊन स्‍वत:च्‍या आईचेच शिर कलम करून आण्‍याचे फर्मानही सोडले, आयएसआयएसची ही क्रुरता अनुभवली इराकच्‍या बोहर (वय 35, काल्पनिक नाव) या यजि‍दी महिलेने.
चार महिन्‍यानंतर पळ काढण्‍यास यशस्‍वी
बोहर ही सध्‍या उत्तर इराकच्‍या दोहुकमधील एका रेफ्यूजी कँपमध्‍ये राहत आहे. तिने ब्रिटिश वेबसाइट मेल ऑनलाइनला दिलेल्‍या इंटरव्यूमध्‍ये सांगितले, गतवर्षी दहशतवाद्यांनी तिच्‍यासह चार वर्षांचा मुलगा हामो (काल्पनिक नाव) त्‍याचे दोन मोठे भाऊ आणि एका बहिणीचे सिंजार डोंगरावरून अपहरण केले. आम्‍हाला 2000 यजीदियांसोबत कैद करून ठेवले. तिथे प्रचंड छळ करण्‍यात आला. चार महिन्‍यानंतर त्‍या ठिकाणाहून पळ काढण्‍यास आम्‍ही यशस्‍वी ठरलो.
काय सांगितले पीडित महिलेने
पीडित महिनेने सांगितले, "माझ्या मुलाला कुरान वाचणे आणि अरबीतून बोलने शिकवले गेले. तलवार चालवण्‍याचे प्रशिक्षणही त्‍याला दिले. आपल्‍याला धर्माच्‍या विरोधात वागणा-यांसोबत लढाई करायची आहे, असे त्‍याच्‍या मनावर बिंबवले. एवढेच नाही तर एकदा त्‍याच्‍या हातात तलवार देऊन सांगितले की, जा तुझ्या आईचे डोके कापून आण." तिने सांगितले, ''बादुश तल-अफर जेलमध्‍ये दहशवाद्यांनी हामो याचे दोन मोठे भाऊ आणि एक बहिणीला बंधक बनवले होते. नंतर आम्‍हाला सीरिया येथे तर काही जणांना रक्‍का येथे घेऊन गेले. ते जिवंत असतील," असा आशावादही तिने व्‍यक्‍त केला.
कारागृहातील अनुभव
बोहरने सांगितले, "तल-अफर कारागृहातील अनुभव हा आयुष्‍यातील सर्वांत कटू अनुभव होता. दहशतवादी वॉटर टँकमध्‍ये मूत्र मिसळवत होते आणि जेवणात गवत देत होते. ऑगष्‍टमध्‍ये सेनेने केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर परिस्थिती आणखी खराब झाली. आकाशात अमेरिकेचे फाइटर जेट्स दिसले की ते आम्‍हाला जनावराप्रमाणे मारत असत." दहशवादी जेवणामध्‍ये मॉर्फीन मिसळवत होते. त्‍यामुळे आम्‍ही नशेत राहत होतो. जो कुणी पळून जाण्‍याचा प्रयत्‍न करत होता किंवा मोबाइल वापरत होता त्‍याला सर्वांसमोर मारून टाकले जात असे, असेही तिने सांगितले.
पुढील स्‍लाइडवर पाहा - संबंधित फोटो....