आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दररोज आळीपाळीने बेशुद्ध होईपर्यंत बलात्कार, आपबीती ऐकून अधिकारीही गहिवरले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या तावडीत सेक्स स्लेव्ह म्हणून राहिलेल्या याझिदी तरुणीने आपल्यावर झालेला अत्याचार पुस्तकात मांडला आहे. 'द लास्ट गर्ल' पुस्तकात 24 वर्षीय नादिया मुरादने आयसिसच्या तावडीत जगणे दररोज मरण यातनेपेक्षा जास्त क्रूर होते असे म्हटले आहे. सेक्स स्लेव्ह म्हणून राहताना ती एकाकडून दुसऱ्या दहशतवाद्याकडे पाठवली जात होती. तिच्यावर दहशतवाद्यांनी इतक्या वेळा बलात्कार केला, तिच्या वेदनाही मेल्या होत्या. या कैदतून आपली सुटका कशी झाली हेही तिने लिहिले आहे. 

 

दिले होते सेक्स स्लेव्हचे आयडी कार्ड..!
> 2014 मध्ये इसिसने सिंजर येथील यझिदी समुदायाच्या गावावर हल्ला केला. पुरुषांना ठार मारले आणि 700 महिलांना उचलून नेले. त्या 7000 महिलांमध्ये त्यावेळी 19 वर्षांची असलेली नादियाचा देखील समावेश होता. 
> इराकमध्ये याझिदी अल्पसंख्याक समुदाय आहे. इराकच्या सिंजर प्रांतात जेवढे याझिदी आहेत तेच जगात उरलेले यझिदी असल्याचे सांगितले जाते. इसिसचे दहशतवादी त्यांना सैतानाचे पुजारी म्हणत होते. 
> इतर 7000 यझिदी महिलांप्रमाणेच वयाच्या 19 व्या वर्षी नादिया सुद्धा आयसिसची सेक्स स्लेव्ह झाली. तिचे अपहरण करताना दहशतवाद्यांनी तिच्या 5 भावांसह आईला देखील ठार मारले होते. 
> नादियाला सेक्स स्लेव्ह म्हणून आयडी कार्ड देखील देण्यात आला होता. त्या पळून जाऊ नये आणि गेल्यास हेच ओळखपत्र तपासून त्यांना पुन्हा पकडले जात होते. 
> जोपर्यंत ती कैदेत होती तोपर्यंत तिच्यावर दररोज दहशतवादी आळी-पाळीने बलात्कार करत होते. अख्खा दहशतवाद्यांचा समूह याझिदी महिलांना कैद करून त्यांचे लैंगिक शोषण करत होता.  
> आयसिसच्या तावडीतून सुटलेली नादिया आता यूएनची राजदूत आहे. तसेच मानव तस्करी विरोधात ती जगभर जनजागृती करते. 


आपबीती ऐकून गहिवरले अधिकारी
> नादियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे जेव्हा आपली आपबीती मांडली तेव्हा तेथे बसलेले अधिकारी देखील गहिवरले. 15 सदस्यांच्या परिषदेसमोर ती म्हणाली, ''आयएस दहशतवाद्यांनी ऑगस्ट 2014 मध्ये माझे अपहरण केले होते. माझ्या समोरच 5 भाऊ आणि आई-वडिलांना ठार मारले."
> "एका बसमध्ये डांबून मला ते मोसूल शहरात घेऊन गेले. मोसूल पोहोचेपर्यंत बसमध्ये सगळेच दहशतवादी माझ्या अंगाला नको त्या-त्या ठिकाणी हात लावत होते. मी रडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी मला बेदम मारहाण केली. मोसूल पोहोचली तेव्हा मी रक्तात माखलेले होते."
> यानंतर त्यांनी नादियाला एका दहशतवाद्याच्या हवाली केले. तो दररोज नादियावर बलात्कार करत होता. एकदा तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा घराबाहेरच्या सुरक्षा रक्षकांनी तिला पुन्हा पकडून आणले. यानंतर त्या नराधमाने नादियाला बेदम मारहाण केली आणि पुन्हा पाश्वी बलात्कार केली.
> त्याचा राग इतक्यातही शांत झाला नाही. दहशतवाद्याने नादियाचे सगळे कपडे काढले आणि तशाच अवस्थेत बाहेर उभे असलेल्या गार्ड्सच्या हवाली केले. त्या सुरक्षा रक्षकांनी नादियावर रात्रभर आळी-पाळीने बलात्कार केला. 
> बेंबीच्या देठापासून आवाज काढत ती ओरडत होती. मात्र, अख्खे शहर नराधमांनी घेरलेले असल्याने तिच्या किंचाळ्या कुणीही ऐकल्या नाही. रात्रभर अत्याचार सुरू असताना ती कधी बेशुद्ध पडली याचा तिलाही भान नव्हता."
> महिलांना डांबून ठेवण्यासाठी त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी दहशतवादी बलात्काराला शस्त्र म्हणून वापरत होते. तीन महिने हा अत्याचार सहन केल्यानंतर तिने त्या घराच्या गॅलरीतून जिवाची परवा न करता गार्डनमध्ये उडी मारली. तेथूनच ती पसार झाली आणि सध्या जर्मनीची नागरिक आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...