आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS : सिंजार पर्वतावरील हिंसाचार, 10 पेक्षा अधिक वय असणा-यांचा घेतला होता जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File Photo: सिरियाच्या रक्कामध्ये दहशतवाद्यांनी नागरिकांना गुडघ्यावर बसून अंधाधुंद गोळीबार केला, असाच नरसंहार कोजोमध्येही करण्यात आला होता. - Divya Marathi
File Photo: सिरियाच्या रक्कामध्ये दहशतवाद्यांनी नागरिकांना गुडघ्यावर बसून अंधाधुंद गोळीबार केला, असाच नरसंहार कोजोमध्येही करण्यात आला होता.
जाखो (इराक) - इराकमध्ये गेल्या वर्षी ISIS च्या हिंसाचारातून वाचलेल्या एका यहुदी व्यक्ती आणि त्याच्या दोन पुतण्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. इराकच्या सिंजार डोंगर परिसरात ISIS ने 800 जणांची सामुहिक हत्या केली होती. ज्यांचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक असेल ती लहान मुले नाही, असे ठरवून त्यांनी अत्यंत निर्दयीपणे त्यांच्या हत्या केल्या. विशेष म्हणजे वय समजण्य़ासाठी त्यांनी मुलांचे अंडरआर्म्स हेअर (काखेतील केस) तपासले. ज्यांना केस असतील त्यांचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक असल्याचे मानण्यात आले. खलाफ नावाच्या एका व्यक्तीने एका वेबसाईटशी बोलताना हा खुलासा केला आहे.

खलाफने सांगितले की, दहशतवाद्यांनी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या गावावर (कोजो) हल्ला केला होता. त्यांनी सर्वांना एका शाळेच्या बिल्डींगमध्ये कोंडले होते. त्यांनी सर्व मुलांच्या काखेतील केस तपासले. ज्यांना केस उगवले होते, ते 10 वर्षांपेक्षा मोठे असल्याचे सांगत त्यांनी मुलांना मारून टाकले. तर मुली आणि महिलांना बंदी बनवण्यात आले. त्यांंना नंतर सेक्ल स्लेव्ह बनवण्यासाठी पाठवण्यात आले.

आधी विचारले, इस्लाम स्वीकारणार का
खलाफच्या मते, “गांवातील पुरुषांना दोन गटांत विभागण्यात आले. एका गटात इस्लाम स्वीकारण्यास तयार असलेले पुरुष होते, तर दुसऱ्या गटात ख्रिश्चन राहू इच्छिणारे होते. दहशतवादी म्हणाले होते की, ते ख्रिश्चनांना सिंजार पर्वतावर नेऊन सोडणार आहेत. पण ती त्यांची चाल होती. त्यांनी लोकांना ट्रकमध्ये भरले आणि बाहेर मैदानात नेऊन गोळ्या घातल्या. 800 लोकांमध्ये प्राण वाचलेलो मी नशीबवान होतो, असे या व्यक्तीने सांगितले. माझ्या दोन भावांना मारण्यात आले. पण मी त्या मृतदेहांमध्ये तसाच पडून राहिलो. त्यानंतर जेव्हा दहशतवादी निघून गेले तेव्हा मी त्याठिकाणाहून निघालो. खलाफच्या कुटुंबातील महिला अजूनही दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. त्याचे दोन पुतणेही यात बचावले आहेत. खलाफच्या मते, दहशतवाद्यांनी लोकांची हत्या केल्यानंतर खरंच सर्व मेले आहेत की नाही, हेही चेक केले होते. त्यांच्यात एक वाचला होता, त्याच्या डोक्यात तीन गोळ्या घातल्या. खलाफच्या मते दहशतवाद्यांनी त्यांचे पैसे, दागिने आणि फोनही हिसकावून घेतला.

30 मिनिटांत मृतदेहांचा खच
खलाफने सांगितले की, गोळ्या घालण्यापूर्वी दहशतवाद्यांनी सर्वांना गुडघ्यावर बसण्यास सांगितले. माझ्या खांद्यावर आणि गळ्याला गोळी लागली होती. मी सरळ खड्ड्यात पडलो, त्यानंतर माझ्या पायाला आणि पोटातही गोळ्या लागल्या पण मी जिवंत होतो. तरीही मि बराचवेळ मेल्याचे नाटक केले. सुमारे 30 मिनिटांनंतर दहशतवादी त्याठिकाणाहून निघून गेले. मी कसाबसा त्या खड्ड्यातून बाहेर आलो. पण त्याठिकाणचे दृश्य धक्कादायक होते. सगळीकडे मृतदेहांचे खच आणि रक्ताचे लोट होते. जे यातून बचावले त्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे जाखोच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले.

हजारों यहुदी बेघर
इराकच्या सिंजारमध्ये ISIS च्या हल्ल्यानंतर हजारो यहुदींना घर सोडावे लागले होते. संयुक्त राष्ट्रांकडून मिळालेल्या निर्णयानुसार सुमारे 50,000 यहुदी अनेक दिवस सिंजारच्या डोंगरांवर लपून बसले होते. आसपासच्या गावांतून बंदी बनवलेल्या महिला आणि मुलींना ISIS च्या ताब्यात असलेल्या मोसूल आणि तल अफरला पाठवण्यात आले. तेथे त्यांची विक्री करण्यात आली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या नरसंहारातील काही PHOTO
बातम्या आणखी आहेत...