आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Charlie Hebdo : पैगंबरांचे कार्टून छापल्याने दहशतवाद्यांनी येथे घडवला होता रक्तपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्ली हेब्दो मॅगझिनचे ऑफिस (डावीकडे), (उजवीकडे वर) लाल वर्लातुळात मारले गेलेले कर्मचारी, ( उजवीकडे खाली) ऑफिसच्या पोलिसावर हल्ला करणारे दहशतवादी. - Divya Marathi
चार्ली हेब्दो मॅगझिनचे ऑफिस (डावीकडे), (उजवीकडे वर) लाल वर्लातुळात मारले गेलेले कर्मचारी, ( उजवीकडे खाली) ऑफिसच्या पोलिसावर हल्ला करणारे दहशतवादी.
फ्रान्समधील प्रसिद्ध व्यंगचित्र साप्ताहिक चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज (7 जानेवारी, 2015) एक वर्ष पूर्ण झाले आहे. या हल्ल्यामध्ये 10 पत्रकारांसह 12 जणांनी प्राण गमावले होते. मोहम्मद पैगंबरांचे कार्टून छापल्यामुळे हे मॅगझीन अनेक दिवसांपासून वादात होते.

असा झाला होता हल्ला....
चार्ली हेब्दोच्या कार्यालयात संपादकीय मिटींग सुरू असताना हा हल्ला झाला होता. काळे मास्क परिधान केलेले दहशतवादी पॅरिसच्या मध्यभागी असलेल्या चार्ली हेब्दोच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी एकच फायरिंग सुरू केले. दोघे हल्लाखोर हे सख्के भाऊ होते. अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या येमेन येथील शाखेचे ते सदस्य असल्याचे समोर आले होते. अल कायदानेच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या घटनेनंतर हल्लेखोर काळ्या रंगाच्या कारमध्ये स्वार होऊन फरार झाले होते. मात्र हल्ल्याच्या दोन दिवसांच्या आतच 9 जानेवारीला फ्रेंच पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांना शोधून कंठस्नान घातले होते.

चार प्रसिद्ध व्यंगचित्रकारांचा मृत्यू
या हल्ल्यामध्ये चार प्रसिद्ध व्यंगचित्रकारांचा मृत्यू झाला होता. त्यात मॅगझीनचे एडिटर-इन चीफ स्टीफन चार्बोनर यांचाही समावेश होता. अत्यंत प्रसिद्ध व्यंगचित्रकार असलेले स्टीफन अल कायदाच्या हिट लिस्टमध्ये होते. त्यांच्याशिवाय मृतांमध्ये जॉर्जस वोलिनिस्की, बर्नार्ड वर्लहाक आणि जीन केबट यांचा समावेश होता.

वादांशी जुने नाते...
2011 मध्ये पैगंबर मोहम्मद यांचे वादग्रस्त कार्टून छापल्यानंतर मॅगझीन चर्चेत आले होते. मॅगझिनने कव्हर पेजवर इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीचे वादग्रस्त व्यंगचित्रही छापले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते की, पैगंबराच्या हल्ल्याचा बदला घेतला असेही हल्ल्यानंतर दहशतवादी म्हणाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, चार्ली हेब्दोवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...