आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yoga Guru Bikram Choudhury Must Pay $900000 To Former Employee

HOT योगगुरुने महिला वकीलाचे केले लैंगिक शोषण, 6 कोटी भरपाई देण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस- बहुचर्चित हॉट योगगुरु विक्रम चौधरीला आपल्या महिला वकीलाला भरपाई म्हणून सहा कोटी रुपये (नऊ लाख डॉलर्स) देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विक्रम चौधरीवर त्याची वकील मीनाक्षी जाफा बोडेन हिने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणी अमेरिकेतील एका कोर्टाने विक्रम चौधरीला दोषी ठरवत हा निकाल दिला आहे.

वकील महिलेचे लैंगिक शोषण...
- अटॉर्नी कार्ला मिनार्ड यांनी सांगितले, की विक्रम चौधरीने वकील मीनाक्षीचे लैंगिक शोषण केले. तिचा अनेकदा विनयभंगही केला. तिला हॉटेलच्या सुईटमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला होता.
- हॉट योगगुरुवरील जुन्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर मीनाक्ष‍ी बाजू मांडत होती.
- मीनाक्षीने हॉट योगगुरुवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर तिची जून 2013 मध्ये नोकरीवरून हकालपट्टी करण्‍यात आली होती.
- या प्रकरणी कोर्टाने योगगुरु विक्रम चौधरीला दोषी ठरवत त्याला पीडितेला सहा कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश‍ दिले.

सहा महिलांनी केले योगगुरुवर आरोप...
2013 मध्ये मीनाक्षीसह सहा महिलांनी विक्रम चौधरीवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. कॅनडामधील जिल लॉवलरने पहिल्यांदा चौधरीवर बलात्काराचा आरोप केला होता. एका इंटरव्ह्यूमध्ये योगगुरुने सांगितले होते की, महिलाच आपल्याला पसंत करतात.

कोण आहे विक्रम चौधरी?
- 69 वर्षीय भारतीय वंशाचा विक्रम चौधरी हा 'विक्रम योग'चा संस्थापक आहे. हॉट योगगुरु म्हणून तो जगभरात लोकप्रिय आहे.
- 220 देशांत 720 योग स्कूल आहेत. यापैकी बहुतांशी स्कूल ब्रिटनमध्ये आहे.
- त्याच्या फॉलोअर्समध्ये मॅडोना, डेमी मूर, बिल क्लिंटनची कन्या चेल्सी क्लिंटन व जॉर्ज क्लूनी सारख्या अनेक सेलिब्रिटीजचा समावेश आहे.

काय आहे विक्रम योग?
- विक्रम चौधरी आपल्या फॉलोअर्सला 40 डिग्री सेल्सियस तापमानात योग शिकवतो. याला 'हॉट योग' असे नाव देण्यात आले आहे.
- वर्ल्डवाइड 650 स्टूडिओमध्ये याचे हजारों फॉलोअर्स उपस्थित असतात.
- विक्रम चौधरीच्या ताफ्यात डझणभर रॉल्स रॉयस, बेन्टले आहेत.
- फोर्ब्सनुसार, विक्रम एका ट्रेनिंग सेशनचे 10 हजार डॉलर्स घेतो. 20 हजार डॉलर्समध्ये तो पर्सनल ट्रेनिंगही देतो.
- विक्रम चौधरीला गेल्या ऑक्टोबर महिन्यात कॉपीराइटप्रकरणी नामुष्कीला सामोर जावे लागले होते.

पुढील स्लाइडवर पाहा, विक्रम चौधरीच्या हॉट योगाचे फोटोज् ...