आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे यू-ट्यूबचा पहिला Video, आतापर्यंत एक कोटी 94 लोकांनी पाहिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान काळात यू-ट्यूब ही आवश्‍यक बाब बनली आहे. गाण्‍यापासून ते चित्रपट पाहण्‍यापर्यंत आपण त्याचा उपयोग करत असतो. दुसरीकडे अनेक डॉक्युमेंट्री चित्रपटे यूट्यूबवर अपलोड केली जातात. नंतर ती व्हायरल होतात. आज प्रत्येकजण यू-ट्यूबशी परिचित आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का यू-ट्यूबवर अपलोड झाला पहिला व्हिडिओ कोणता आहे?
याचे उत्तर असे,की 10 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच 23 एप्रिल 2005 मध्‍ये यू-ट्यूबवर पहिला व्हिडिओ टाकण्‍यात आला होता. मी अॅट द झू या नावाचा व्हिडिओ यू-ट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम यांनी जावेद या नावाने अपलोड केले होते. त्यात करीम एक प्राणीसंग्रहालयाच्या आत उभे आहेत. 18 सेकंदाच्या या व्हिडिओत काही विशेष नव्हते. दुसरीकडे क्वॉलिटीही खराब होती. यानंतर आतापर्यंत 1 कोटी 94 लाख लोकांनी तो पाहिला आहे.