आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Kurdish Girl Fires A Machine Gun Claims She Has Killed 400 Isis Men

VIDEO: चार वर्षांची चिमुकली चालवते मशिनगन, 400 IS ला मारल्याचा केला दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोबान - सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांचा कुर्दिश फिमेल फायटर्स जोरदार मुकाबला करत आहेत. त्यात आता एका चार वर्षांची कुर्दिश बालिकेचा मशिनगन चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लाइव्ह लीकच्या वृत्तानुसार, या व्हिडिओत दिसत असलेल्या बालिकेने 400 आयएस दहशतवाद्यांना कंठस्नान घातला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
वायपीजीकडून चार वर्षांच्या बालिकेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे, की एक चार वर्षांची मुलगी एका व्यक्तीसोबत बोलत असते आणि त्याच्याससमोर मशिनगन ठेवलेली असते. गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील ही मुलगी अरबी भाषेत काही बोलत असते. ती 'शुटिंग अॅट दाएश' असे शब्द उच्चारत वाळवंटात गोळीबार करताना दिसते. अरबी भाषेत आयएसआयएसला दाएश असे संबोधतात. व्हिडिओ शुट करणारी व्यक्ती जेवढ्या वेळा तिला किल-किल असे म्हणतो तेवढा वेळ ती फायरिंग करत राहाते. जेव्हा तिला विचारले जाते की तु किती दहशतवाद्यांना ठार केले तेव्ही ती तिच्या हाताची चार बोटे दाखवते.
काय आहे वायपीजी
सीरियाच्या कुर्दिश डेमोक्रॅटिक युनियन पार्टीची हे आर्म्ड युनिट आहे. पीपल्स ऑफ प्रोटेक्शन या अर्थाने वायपीजी ओळखले जाते. उत्तर इराक आणि सीरियाच्या काही भागांमध्ये वायपीजी आयएसआयएसविरोधात लढत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बालिकेचा मशिनगन चालवतानाच व्हिडिओ