आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे 9 वर्षांच्या चिमुकल्या मुलींचा होतो विवाहा, छायाचित्रकाराने आणले भयावह चित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालवधू : 13 वर्षांची वाद, 16 वर्षांची अयात आणि 15 वर्षांची खालिदिया संवाद साधताना. वादचे जबरदस्तीने विवाहा करण्‍यात आला होता. आज तिचा घटस्फोट झाला आहे. - Divya Marathi
बालवधू : 13 वर्षांची वाद, 16 वर्षांची अयात आणि 15 वर्षांची खालिदिया संवाद साधताना. वादचे जबरदस्तीने विवाहा करण्‍यात आला होता. आज तिचा घटस्फोट झाला आहे.
सीरियातील यादवी युध्‍दापासून जीव वाचवून पळून गेलेले कुटुंब आपल्या कमी वयाच्या मुलींचा विवाहा करीत आहेत. याचे कारण गरिबी आहे. इटलीचा छायाचित्रकार लॉरा एगीओ काल्डनने लेबनॉनमधील हवास अल हरीमी छावणीला भेट दिली. येथे काही मुलींनी आपली भयावह आपबीती सांगितली. गरिबीमुळे लहान वयातच मुलींचा विवाहा...

- छायाचित्रकार लॉराने सांगितले, बहुतेक सीरियन कुटुंबे यादवी युध्‍द आणि आयएसआयएसपासून जीव वाचावे म्हणून लेबनॉनला पळून आले आहेत.
- गरिबी प्रचंड असल्याने कुटुंबांना सर्वांचे पालनपोषण करणे अशक्य असते. अशा स्थितीमुळे नऊ ते पंधरा वर्षांच्या मुलींचे लग्न लावले जात आहे.
- ज्यांच्याबरोबर विवाहा लावला जात आहे, त्यांचे वय दुप्पट किंवा तिप्पट होते.
प्रत्येक मुलीची एक कथा
- 15 वर्षांची मारवा एका मुलाची आई आहे. वयाच्या 12 व्या वर्षी तिचा विवाहा करण्‍यात आला होता. तिच्या पतीचे वय 23 वर्ष आहे.
- रुकायाची 14 व्या वर्षी साखरपुडा करण्‍यात आला. तिचा भावी पती कार्यक्रमात टेडीबिअर घेऊन आला होता.
- छायाचित्रकाराच्या मते, मुली यादवी युध्‍दाच्या बळी ठरत असून एक पिढी संपत आहे.
- लॉरा 13 वर्षांची मुलगी नूरला भेटला. तिने सांगितले, की तिचे कुटुंब सीरियातून पळून आले आहे. तिचा 27 वर्षांच्या तरुणाशी विवाहा लावून देण्‍यात आला.
- समीराचे(14 ) आयएसआयएसने अपहरण केले होते. मात्र ती पळून जाण्‍यात यशस्वी झाली. तिला आज सात वर्षांचा मुलगा आहे.
- 14 वर्षांची हौदा चार वर्षांपूर्वी रक्कातून आली होती. तिचा पती बेरुतमध्‍ये काम करतो.
प्रत्येक चार मुलींमध्‍ये एक बालवधू
- युनिसेफच्या मतानुसार, वयाच्या 18 वर्षाच्या आत विवाहा करणे मानवाधिकाराचे उल्लंघन समजले जाते.
- जगात 20 ते 24 व्या वर्षी विवाहा केला जातो. दुसरीकडे चारपैकी एक मुलगी बालवधू असते.
- या आठवड्यात सीरियातील यादवी युध्‍दाला सहा वर्षे पूर्ण होतील. शस्त्रसंधी असूनही लोक घरे साडेत आहेत.
- जितकी जास्त हिंसा होईल, बालविवाहांचे प्रमाण वाढेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...