आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शून्यातून 10 अब्ज डॉलर्सच्या उलाढालीपर्यंत झेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९७८ मध्ये २५ वर्षांचे जॉन मॅके आणि त्यांची २१ वर्षीय प्रेयसी रेली लॉसनने कुटुंबाकडून ४५,००० डॉलर्स कर्ज घेऊन ऑस्टिनमध्ये नैसर्गिक अन्नपदार्थांचे छोटे दुकान सुरू केले. या दुकानाचे नाव होते सेफर-वे. मात्र, लवकरच दालनाचे सामान ठेवण्यासाठी या जोडप्याला आपल्या अपार्टमेंटमध्ये जागा द्यावी लागली.
 
घर रिकामे करून त्यांनी स्टोअरमध्ये बिऱ्हाड थाटले. मात्र, दालन कमर्शियल झोनमध्ये होते. त्यामुळे तेथे सुविधा मोजक्याच होत्या. स्नानगृह नव्हते. त्यामुळे डिशवॉशरशी जोडलेल्या  नळाने सर्व दैनंदिन कामे करावी लागत.  
 
दोन वर्षांनंतर १९८० मध्ये मॅकेने क्रेग वेलर आणि मार्क स्किल्सच्या किराणा दालन क्लार्कवेली नॅच्युरल्स ग्रोसरीमध्ये सेफर वेला विलीन केले. या दोन दालनांच्या एकीकरणानंतर नाव बदलून - होल फूड मार्केट असे नाव देण्यात आले.
 
पहिले दालन १०,५०० चौरस फुटांच्या जागेत सुरू केले होते. तेव्हा येथे १९ जणांचा स्टाफ होता. त्या वेळी हे इतर फूड स्टोअर्सच्या तुलनेत बरेच मोठे होते. मात्र, सुरुवातीला अनंत अडचणी आल्या. 
 
एका वर्षाच्या आत या शहरात पुराने उत्पात घडवला. त्यामुळे स्टोअरचे सर्व सामान खराब झाले. सर्व इलेक्ट्रॉनिक यंत्रे खराब झाली. होल फूड मार्केटला जवळपास ४ लाख डॉलर्सचे नुकसान झाले. कंपनीचा विमाही नव्हता. मात्र ग्राहक, कर्मचारी आणि शेजाऱ्यांच्या मदतीने दालन पुन्हा उभे केले. पुराच्या २८ दिवसांनंतर दालन पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर याचा वेगाने विकास झाला.  
 
तीन वर्षांनंतर १९८४ मध्ये होल फूड मार्केटचा विस्तार करण्यात आला. ऑस्टिनच्या बाहेर पहिले स्टोअर ह्युस्टनमध्ये सुरू केले. आज कंपनीची स्टोअर्स अमेरिकेशिवाय कॅनडा, ब्रिटनमध्ये आहेत. आता ही १० अब्ज डॉलर्सची कंपनी झाली आहे.
 
मॅके म्हणतात, नव्या पिढीला हवे असलेले उत्पादन आम्ही विकू इच्छितो. सुरुवातीला हे संपूर्ण कुटुंब एकत्र नव्हते. विशेषत: आई. तिने म्हटले होते की मॅकेने पुन्हा शिक्षण घ्यावे. 
मात्र,  त्यांनी नकार दिला.
 
आईचा मुलाच्या कामावर मुळीच विश्वास नव्हता. शिवाय तिला हे काम पसंतही नव्हते. त्यामुळे मॅके आईच्या फारसे जवळ नव्हते. मात्र, वडिलांची मानसिकता वेगळी होती. वडील बिल मॅकी यांनी या दालनात गुंतवणूक केली. अनेक वर्षे ते या कंपनीच्या संचालक मंडळावर होते. १९९२ नंतर मॅके यांनी कंपनीचे विस्तारीकरण झपाट्याने करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वडिलांना हे मान्य नव्हते.
 
 या उद्योगाचा पसारा वाढवणे त्यांना जोखमीचे वाटे. त्यामुळे पिता-पुत्रात मतभेद होत. मॅकेने त्यानंतर ठाम निर्णय घेतला व वडिलांना राजीनामा देण्यास सांगितले. जीवनात हे सर्वात अवघड काम होते, असे ते सांगतात. त्यांच्या मनात भीतीही होती.   
 
वडिलांवर ते अवलंबून होते. त्यांना नाकारणे जड गेले. अपराधीपणाची भावना मनात बळावली. एक वर्षानंतर वडिलांनी त्यांना माफ केले. मॅके यांचा देवावर विश्वास नाही. ते चर्चमध्ये जात नाहीत. ईश्वराचे जगात मान्य असलेले स्वरूप त्यांना मान्य नाही. प्रत्येक भौतिक वस्तूच्या मागे एक सखोल अध्यात्मिक सत्य असते असे त्यांचे मत आहे. 
 
त्यासाठी कोणतीही परिभाषा वापरणे कठीण आहे. मी जीवनाच्या शोधात अाहे, असे ते सांगतात. ते मला प्राप्त झाले आहे असेही वाटते. एखाद्या गुरूंद्वारे किंवा पुस्तकातून नव्हे तर बिझनेसमध्ये. होल फूड माझा आश्रम आहे. येथेच मी जीवनातील मोठे धडे गिरवले आहेत.
 
-या फूड चेनमध्ये केवळ ऑर्गेनिक फळे, भाज्या मिळतात. यात कृत्रिम रंग, रासायनिक घटक किंवा अर्कांचा वापर केलेला नाही.
- एका वर्षात दालन उद्ध्वस्त झाले. ४ लाख डॉलर्सचे नुकसान झाले होते.  
- १९८० मध्ये सुरुवात झाली होती. त्या वेळी १९ कर्मचारी होते. आता ४६९ दालनांत ९१,००० पेक्षा अधिक कर्मचारी.  
 
बातम्या आणखी आहेत...