आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाशी मरतेय देशाची जनता, तर हुकुमशहाची मुले अशी एन्जॉय करताहेत LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिंम्बाब्वेचा हुकुमशहा रॉबर्ट मुगाबेचा मुलगा बेलारमाईन चाटुंगा.... - Divya Marathi
झिंम्बाब्वेचा हुकुमशहा रॉबर्ट मुगाबेचा मुलगा बेलारमाईन चाटुंगा....
इंटरनॅशनल डेस्क- झिंम्बाब्वेचा हुकुमशहा रॉबर्ट मुगाबेची दोन्ही मुले बुधवारी न्यूयॉर्कमध्ये दिसली. यूनायटेड नेशन्स जनरल असेम्बलीच्या 72 व्या सेशनसाठी सध्या मुगाबे 10 दिवसासाठी फॅमिलीसह अमेरिकेत पोहचले आहेत. रॉबर्टसोबत 70 मेंबर्सचे डेलीगेशन पोहचले आहे. ज्याचा रोजचा खर्च सुमारे एक लाख रुपये आहे. मात्र, या दरम्यान सर्वात जास्त चर्चेत आहेत त्याची दोन मुले. कारण देश भुखेने तडपडत आहे तर दोघांनी आपल्यासाठी दोन रॉल्स रॉईस खरेदी केल्या आहेत. मुगाबेची दोन्ही मुले लॅविश लाईफसाठी ओळखली जातात. तर, झिंम्बाब्वेची 70 टक्के जनता उपासमारीने त्रस्त आहे. तेथे प्रति व्यक्ती केवळ 70 रुपये उत्पन्न आहे. महागड्या पार्टीजमध्ये तरूणींच्या घोळक्यात दिसतात दोघे.....
 
- मुगाबेला एक मुलगी आणि दोन मुले बेलारमाईन चाटुंगा आणि रॉबर्ट आहे. 
- बेलारमाइन आणि रॉबर्ट झिंम्बाव्बेत आपल्या लॅविश लाईफसाठी फेमस आहेत.
- दोघांना पार्टीजचा खूपच छंद आहे. ज्यात ते तरूणींच्या घोळक्यात दिसतात. 
- दोघेही पार्टीज आणि लग्झरी लाईफचे फोटोज सोशल मीडियात शेयर करतात. 
- याशिवाय त्यांच्याजवळ महागड्या बाईकपासून एकापेक्षा एक सरस अशा कारचा ताफा आहे. 
- दोन्ही मुलांशिवाय मुलगी बोना आणि वाईफ ग्रेस मुगाबे सुद्धा लग्झरी लाईफसाठी ओळखली जाते. 
 
नुकतेच एका मॉडेलची धुलाई केली होती ग्रेसने-
 
- मागील महिन्यात दक्षिण अफ्रिकेच्या एका मॉडेलने ग्रेस मुगाबेवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. 
- 20 वर्षाच्या मॉडेल ग्रेब्रिएला एंजेल्सने आरोप केला होता की, ग्रेसने जोहान्सबर्गमधील एका हॉटेलमध्ये खूप मारले होते.
- ग्रेबिएलाने सांगितले की, त्यांच्या मुलांनी आयोजित केलेल्या हॉटेलातील पार्टीत मला निमंत्रित केले होते. जेव्हा ग्रेसने तिला तिच्या मुलांसमवेत पाहिले त्यामुळे मारहाण केली.
-झिंम्बाब्वेच्या मीडिया रिपोर्टनुसार, एका रस्ते अपघातात ग्रेस मुगाबेच्या पायाला जखम झाली होती. त्यावर उपचार करण्यासाठी ग्रेस जोहान्सबर्गला गेली होती. तेथे तिच्यासमवेत मुलेही होती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मुगाबेच्या फॅमिलीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...