आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो मातांना ‘जन्म’ने वाचवले, मिळाला सन्मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रसंघ - महिलांसाठी कार्य करणाऱ्या झुबेदाबाईला आपले जगभर कौतुक होईल, असे स्वप्नातही वाटले नसेल. ‘अयाझ’ ही सामाजिक संस्था चालवणाऱ्या झुबेदा यांचा नुकताच संयुक्त राष्ट्रसंघात सन्मान झाला. त्यांचा समावेश ‘ग्लोबल कॉम्पॅक्ट एसडीजी पायोनियर्स, २०१६’च्या यादीत करण्यात आला आहे. जगातील दहा चॅम्पियन व पायोनिर्समध्ये त्यांचा समावेश झाला आहे. मुलांना ज्या मातांनी जन्म दिला आहे अशांसाठी ‘अयाझ’ने एक सुरक्षा किट तयार केले आहे. प्रसूतीच्या काळात होणाऱ्या विषाणुबाधेपासून या किटमुळे संरक्षण होते. या किटचे नाव ‘जन्म’ असे ठेवण्यात आले असून जगातील अनेक देशांत याची निर्यात होते. झुबेदाची यशकथा तिच्याच शब्दांत...

शालेय शिक्षण संपताच बँकिंग प्रॉडक्ट पुरवण्याचे काम सुरू केले. तेव्हा मी १७ वर्षांची होते. काही दिवसांत मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. कुटुंबात मी पहिली पदवीधारक होते. प्रारंभी कार डिझायनिंग कंपनीत काम केले. तिथे मी एकटीच मुलगी होते. मास्टर पदवीसाठी मी अनेक विद्यापीठांत अर्ज केले. परंतु, जमले नाही. शेवटी स्वीडनमधील डॉलरना विद्यापीठाचे बोलावणे आले. धाडसाने मी घर सोडले.

या विद्यापीठामार्फत पोलंडला जाण्याचा योग आला. दुसरे सत्र पूर्ण करून मी चेन्नईला परतले. तेथे हबीब अन्वरची भेट झाली. नंतर त्यांच्याशीच विवाह केला. आम्ही दोघांनी अयाझचा पाया रचला. महिलांचे आरोग्य व सशक्तीकरणासाठी अयाझला एक आदर्श संस्था म्हणून मला घडवायचे हाेते. २००६ मध्ये मला पहिला मुलगा झाला. शस्त्रक्रियेनंतर मला महिनाभर विश्रांती घ्यावी लागली. यातून पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी वर्ष लागले. लहानपणी अनेक गरीब महिलांना पैशाअभावी हे कष्ट सोसताना मी पाहिले होते.

२००९ मध्ये कोलेरॅडोमध्ये एमबीए करत असताना एका प्रकल्पाअंतर्गत मला भारतात येण्याची संधी मिळाली. चेन्नई येथील ग्रामीण भागांत मी काम केले. यादरम्यान राजस्थानात एक दायी भेटली. तिचे कार्य पाहून मला प्रेरणा मिळाली. महिलांना प्रसूतीदरम्यान इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी काहीतरी करण्याचे मी ठरवले. नेपाळ दौऱ्यात मी महिलांना एक किट वापरताना पाहिले. मात्र, ते किट दर्जेदार नव्हते. मग मी स्वत: या प्रकारचे नवे किट तयार करण्याचे काम सुरू केले. येथूनच खऱ्या अर्थाने महिलांसाठी ठोस कार्य करण्यास माझ्या जीवनात प्रारंभ झाला. २०१० मध्ये ‘जन्म’ किट मी तयार केली. याची चाचणी बंगळुरूतील तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने घेतली. या शोधामुळे अनेक पुरस्कारही मिळाले. वर्षभरात ३ हजार किट तयार केले. नंतर आम्ही अमेरिकेतही किट तयार करण्यास प्रारंभ केला. २०१३पर्यंत भारत, अफगाणिस्तान, हैती, लाओस आणि आफ्रिकेतील देशांमध्ये असे सुमारे ५० हजार किट विकले. नंतर मागे वळून पाहिले नाही.’
बातम्या आणखी आहेत...