आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी भरते दहशतवाद्यांची शाळा, समोर आले Inside PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - टाळके फिरवणारे हे फोटोज अफगाणिस्तानच्या हिंदू कुश पर्वत रांगांच्या आहेत. येथे मोकळ्या आकाशाखाली कुख्यात दहशतवादी संघटना तालिबानची शाळा भरताना दिसून येते. हे फोटोज तालिबानच्याच टीव्ही चॅनलने जारी केले आहेत. ही शाळा केवळ मुलांसाठी आहे. कारण, तालिबानी शासनात मुलींना शिकण्याची परवानगी नाही. इतर काही छायाचित्रांमध्ये लोक हातात बंदूका घेऊन गस्त लावताना दिसत आहेत. 

 

> हिंदू कुश पर्वतरांगांमध्ये असलेल्या काबूलच्या ईशान्येकडील इमाम गजली शाळेतील ही छायाचित्रे आहेत. 
> स्त्री शिक्षणास तीव्र विरोध करणाऱ्या या तालिबानी शाळेत केवळ मुलांना प्रवेश दिला जातो. तसेच लहानपणापासूनच त्यांच्या मनात कट्टरपंथी विचार रुजवले जातात. 
> अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा तालिबानी संघटनेच्या शाळांच्या विविध ठिकाणी शाखा आहेत. 
> या शाळेत कट्टरपंथी कायद्यांचे शिक्षण देणे, शस्त्र चालवणे, हल्ला करणे आणि बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण असे प्रकार सर्रास सुरू आहेत. 
> शाळेत दहशतवादाचे प्रशिक्षण सुरू असताना परिसरात सशस्त्र दहशतवादी पेट्रोलिंग करताना आणि परकियांवर नजर ठेवताना दिसत आहेत. 
> तालिबानचा शब्दशः अर्थ विद्यार्थ्यांची संघटना असला तरीही तालिबानने पाश्चिमात्य शिक्षणाविरोधात मोहिम छेडली. तसेच पाकिस्तानातील जवळपास 1000 शाळा बंद केल्या आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या शाळेच्या आतील फोटोज...

बातम्या आणखी आहेत...