लाहाेर- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात तेहरिक-ए-तालिबान व जमात-उल-अहरार या संघटनांच्या १० दहशतवाद्यांना रविवारी अटक करण्यात अाली. त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणावर घातक शस्त्रेदेखील जप्त करण्यात अाली अाहे.
ही कारवाई रविवारी पाकिस्तानी रेंजर्स, स्थानिक पाेलिस, इलाइट फाेर्स व गुप्तहेर संस्था यांनी मिळून केली. कारवाईदरम्यान संबंधित गावात काेणालाही जाण्यास व येण्यास मज्जाव करण्यात अाला हाेता, असे पाेलिसांनी सांगितले. अनेक तास चाललेल्या या कारवाईत १० संशयितांना अटक करण्यात अाली. तसेच ८६ पिस्तूल, रायफल्स, कार्बाइन, शंभरावर जिवंत काडतुसे अादी माेठा शस्त्रसाठा जप्त करण्यात अाला. या वेळी संशयितांकडून जुन्या माॅडेलचे माेबाइलदेखील ताब्यात घेण्यात अाले. सर्व संशयितांना चाैकशीसाठी अज्ञात स्थळी हलवण्यात अाले असून, त्यांचा तेहरिक-ए-तालिबान व जमात-उल-अहरार या संघटनांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात अाला अाहे. दरम्यान, पाकच्या गृहमंत्र्यांनी पंजाब प्रांतात रेंजर्सचा मुक्काम अाणखी दाेन महिने वाढवला अाहे. दहशतवादामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी रेंजर्स तैनात करण्यात अाले अाहेत.