आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Indians Evacuated From Yemen By Pakistani Naval Ship

पाकच्या जहाजाने अशांत येमेनमधून वाचवले 11 भारतीयांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - कट्टरवाद्यांच्या कारवायांमुळे येमेनमध्ये अशांतता असून या देशातून ११ भारतीयांना पाकिस्तानी जहाजाने आपल्या नागरिकांसोबत सुरक्षित बाहेर काढले.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानुसार, पाक सरकारने येमेनमधून आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी ‘पीएनएस असलत’ हे जहाज पाठवले होते. शुक्रवारी ते मोकाला शहरालगत सागरी हद्दीत पोहाेचले. या शहरातून ३५ विदेशींसह १८३ लोकांना घेऊन ते कराचीकडे रवाना झाले. पाकिस्तानी जहाजातून ११ भारतीयांसह चीनचे ८ व ब्रिटनचे चार नागरिकही बाहेर पडले आहेत.

जोखमीचे काम
येमेनमधून विदेशी लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगावी लागत आहे. अॅश शीहर बंदर बचावकार्याचे केंद्र आहे. अतिरेकी हल्ल्याचा धोका पाहता लोकांना देशाबाहेर काढणे अत्यंत जिकिरीचे ठरत असून, त्यासाठी लढाऊ जहाजे व लष्करी हेलिकॉप्टर्सचा वापर होत आहे.

मोकाला शहर सर्वांत घातक
मोकाला शहर हे येमेनमध्ये सर्वांत घातक शहर ठरले आहे. येमेनच्या हद्रमवात या प्रांताची राजधानी असलेल्या या शहरात अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रभाव असून जवळपास संपूर्ण शहर या दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली आहे. मोकालामध्येच दहशतवाद्यांनी तुरुंगावर हल्ला करून ३०० कैद्यांची सुटका केली होती. यातील बहुतांश दहशतवादी होते. या बंदराशी जोडणारे सर्व रस्ते दहशतवाद्यांनी बंद केले आहेत.