आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये असा दिसला नजारा, खिडक्यातून उड्या मारू लागले लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराचीतील रिझेंट प्लाझा या 5 स्टार हॉटेलला लागलेली आग.. - Divya Marathi
कराचीतील रिझेंट प्लाझा या 5 स्टार हॉटेलला लागलेली आग..
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानमधील एक मोठे शहर कराचीत सोमवारी एका 5 स्टार हॉटेलला आग लागली होती. या आगीत आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 75 हून अधिक लोक होरपळले आहेत. ही आग कराचीतील रिझेंट प्लाझा हॉटेलच्या ग्राउंड फ्लोवरच्या किचनमध्ये लागली व ती वेगाने पसरली. त्यामुळे कोणी तिस-या मजल्यावर उड्या मारल्या तर कोणी चादरीच्या दोरी बनवून खाली उतरताना दिसले.....
- आग इतक्या वेगाने पसरली की संपूर्ण हॉटेलात गडबळ गोंधळ उडाला. लोक इकडे तिकडे पळू लागले, ओरडू लागले.
- अनेक लोकांनी आपला जीव वाचविण्यासाठी तिस-या मजल्यावरून उड्या फेकल्या तर काहींनी खिडक्यांच्या काचा फोडत मदतीसाठी याचना केली.
- पाचव्या मजल्यावर अडकलेल्या लोकांनी हॉटेलमधील चादरीच्या दोरी करत खाली उतरण्याचा मार्ग पत्करला.
- एका व्यक्तीचा मृत्यू उडी मारल्याने तर 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात चार महिलांचा समावेश आहे.
- या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या व आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले.
- अखेर तीन तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले.
- 75 पेक्षा अधिक लोक आगीत भाजले आहेत. यातील काहींची स्थिती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
- जखमींवर जिन्ना मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कराचीतील हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर ओढवलेल्या परिस्थितीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...