आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानच्या बलूचिस्तानमधील दर्ग्यात आत्मघातकी हल्ला, 13 जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वेटा- पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील फतेहपूर दर्ग्यात गुरूवारी आत्मघातकी हल्ला झाला. या हल्यात 13 लोकांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ही दर्गा बलूचिस्तानच्या मग्सी जिल्हात आहे. लोक नमाजसाठी एकत्र आले होते, त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. प्रांताचे गृहमंत्री सरफराज बुग्ती यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

एंट्री गेटवर स्वत:ला उडवले...
'द डॉन'ने लोकल अथॉरिटीचा हवाला देत म्हटले, सुसाइड बॉम्बर दर्ग्यात दाखल होण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा रक्षकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने गेटवरच स्वत:ला उडवले. हा हल्ला त्यावेळी करण्यात आला, जेव्हा लोक नमाजसाठी एकत्र जमले होते.

वाढू शकतो मृतांचा आकडा...
- मीडिया रिपोर्टनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण, इतर दिवसांच्या तुलनेत याठिकाणी जास्त गर्दी होती.
- मिलिट्री मीडिया विंगच्या प्रमुखांनी काही तासांपुर्वी दहशतवाद्यांच्या विरोधात सैन्याच्या कारवाहीची स्तुती केली होती. त्यानंतर काही तासांतच हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...