आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३४ मच्छीमार भारताच्या तुरुंगात; पाकचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या १३४ मच्छीमारांना भारताच्या तुरुंगात डांबण्यात आले असून या सर्व मच्छीमारांना मायदेशी अर्थात पाकिस्तानात परत आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचे पाकिस्तानी सरकारने म्हटले आहे.

पाक संसदेच्या वरिष्ठ सभागृहात यासंबंधी मुद्दा उपस्थित झाल्यानंतर प्रश्नोत्तरात वाणिज्य मंत्री खुर्रम दस्तगिर खान यांनी हा दावा केला. मच्छिमारांची सुटका हा भारतासोबतचा कायमचा वाद आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडे वारंवार मागणी करण्यात आली आहे. अनेकवेळा प्रयत्न केल्यानंतर आतापर्यंत केवळ ६८ मच्छिमारांची सुटका करण्यात यश आले आहे. अजुनही १३४ मच्छिमार भारताच्या तुरुंगात आहेत. मच्छिमारांच्या अटकेचा विषय मानवी पातळीवरील आहे. त्यामुळे सरकारने त्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अनेक मच्छिमारांनी कैदेची शिक्षा पूर्ण केली आहे. त्यानंतरही त्यांची मुक्तता करम्यात आलेली नाही. दरम्यान, दोन्ही देशांकडून सागरी क्षेत्र आेलांडणाऱ्या मच्छिमारांना अटक केली जाते.
बातम्या आणखी आहेत...