आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी पंतप्रधानांच्या विरोधात 15 खटले पुन्हा सुरू होण्याची चिन्हे; जेआयटीची शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पनामा पेपर्स लिंक प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विरोधातील १५ खटले पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी शिफारस या प्रकरणात स्थापन संयुक्त तपास समितीने (जेआयटी) केली आहे. शरीफ यांच्या कुटुंबीयांच्या लंडनमधील मालमत्तेशी संबंधित ही प्रकरणे अाहेत. त्यामुळे शरीफ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 
 
सहा सदस्यीय जेआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. जेआयटीने आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात १० जुलै रोजी सादर केला होता. शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांची जीवनशैली ही त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्राेतापेक्षा अधिक महागडी आहे. शरीफ तसेच त्यांची मुले उंची कपडे, वस्तू वापरतात. त्यामुळेच त्यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी नवीन खटले दाखल केले पाहिजेत, अशी शिफारस करण्यात आली आहे. शरीफ यांनी अहवालातील आरोप फेटाळताना ते बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. शरीफ यांच्या विरोधात फाइल उघडणार असल्याचा दावा ‘डॉन’ने केला आहे. जेआयटीने न्यायालयात शरीफ यांच्या विरोधातील जुन्या पंधरा प्रकरणे सुरू करण्याची शिफारस केली आहे. त्यापैकी लाहोर उच्च न्यायालयाने निश्चित केलेली पाच प्रकरणे, आठ प्रकरणांत तपासाची गरज आह.  दोन प्रकरणांत शरीफ यांची चौकशी करण्याचा सल्ला दिला. 

मनी लाँडरिंगचा आरोप 
हाय-प्रोफाइल प्रकरणात शरीफ यांनी १९९० मध्ये मनी लाँडरिंग केल्याचा ठपका आहे. तेव्हा शरीफ यांनी दोनवेळा पंतप्रधानपद उपभोगले. त्याच दरम्यान त्यांनी लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता गोळा केली. गेल्या वर्षी त्यांच्या मालमत्तेबाबतचा तपशील चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर पाकिस्तानातील विरोधकांनी शरीफ यांना लक्ष्य केले.