आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या ताफ्यात १६ थंडर जेट समाविष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - अत्याधुनिक जेएफ १७ थंडरची १६ विमाने पाकिस्तान हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. चीन व पाकिस्तानने संयुक्तपणे या विमानांची निर्मिती केली आहे. यामुळे पाकिस्तानी हवाई दलाच्या रणनीतिक आणि देखरेख क्षमतांमध्ये वाढ होणार आहे.
संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांच्या हस्ते थंडर जेटचा ताफा स्क्वॉड्रन २ तुकडीकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी हवाई दलप्रमुख सोहेल अमन म्हणाले, देशाविरुद्धच्या कोणत्याही धोक्याशी लढा देण्यासाठी पाक हवाई दलास तयार करण्यात आले आहे. जर्ब-ए- अजब कारवाईत हवाई दल मैदानी तुकड्यांना मदत करत आहे. पाक हवाई दलाने २०१५ मध्ये जेएफ- १७ च्या १६ विमानांची निर्मिती करून उद्दिष्ट पूर्ण केले आहे. पाक २०१६ मध्ये २४ विमानांची निर्मिती करणार आहे. जेएफ - १७ थंडर एका इंजिनाचे विविध आघाड्यांवर काम करणारे लढाऊ विमान आहे. चीन- पाक संयुक्त विमान निर्मिती प्रकल्पाची सुरुवात १९९९ मध्ये झाली होती.