आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीची तपासणी करा, मुंबईवरील हल्ला, पाक कोर्टाचे आयोगाला आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - मुंबईवरील२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी वापरलेल्या कथित बोटीची तपासणी करा, असा आदेश येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने पाकिस्तानी न्यायालयीन आयोगाला दिला आहे.
दहशतवादविरोधी न्यायालयात मंगळवारी मुंबई हल्ला प्रकरणाची सुनावणी झाली. दहशतवाद्यांनी वापरलेली कथित ‘अल्फोझ’ ही बोट न्यायालयात आणणे शक्य नसल्याने कराचीत जाऊन तिची तपासणी करण्यासाठी न्यायालयीन आयोगाला तेथे पाठवावे, अशी विनंती फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) केली होती. न्यायालयाने ती मान्य केली. आयोग कराचीला जाऊन या बोटीची तपासणी करेल शिवाय मुनीर या साक्षीदाराचा जबाबही नोंदवेल. एफआयएने दहशतवादविरोधी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात सुफियान जफर या संशयिताची नोंद आरोपपत्राच्या दुसऱ्या कॉलममध्ये केली होती. त्याचा अर्थ या आरोपीच्या विरोधात पुरावा आढळला नाही, असा होतो. फिर्यादी पक्षाच्या मते, जफरने इतर संशयितांना आर्थिक मदत केली होती. एफआयएने आरोपपत्रात म्हटले आहे की, जफरने संशयितांच्या खात्यात १४ हजार रुपये ट्रान्सफर केले. तपासादरम्यान चौकशी करणाऱ्यांना असे आढळले की, रक्कम कशासाठी हवी, याची माहिती घेताच जफरने इतर संशयितांनाही रक्कम दिली.

भारताने सुचवला होता कायदेशीर मार्ग
मुंबई हल्ला प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी भारताने पत्र लिहून पाकिस्तानला काही कायदेशीर मार्ग सुचवले होते. त्यानंतर न्यायालयाने बोटीची तपासणी करण्याचा निर्णय दिला.
बातम्या आणखी आहेत...