आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकमध्ये लष्करी कारवाई सुरू, २९ दहशतवाद्यांचा खात्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये लष्कराने केलेल्या कारवाईत किमान २९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. गेल्या एक महिन्यात लष्कराने तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या तळांवर लष्कराने हे हल्ले केले. त्यात अतिरेकी ठार झाले. तेहरिक-ए-तालिबानचे दहशतवादी बलुचमधील विविध भागांत दडून बसले होते. बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती आणि ब्रिगेडियर मोहंमद ताहिर यांनी दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमेची माहिती दिली. तेहरिक आणि फुटीरतावादी गटाच्या अनेक अतिरेक्यांना लक्ष्य करण्यात आले. मृतांमध्ये आत्मघाती हल्लेखोरांचाही समावेश आहे.

उत्तर वझिरिस्तान प्रांतात सरकारने झर्ब-ए-अझ्ब ही लष्करी मोहीम राबवली होती. त्यात अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. कालाट, मास्टंग, आवारन, तुर्बट, झोब, लोरालाई, किल्ला अब्दुल्ला या जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्कराने जाेरदार मोहीम राबवली. जवानांनी सहा बंडखोरांना अटक केली. त्याशिवाय कारवाईत १ हजार ३५० किलोग्रॅम स्फोटके, १२ आत्मघाती जॅकेट, ४० आयईडी, सहा जिवंत बाँब, ५० हँडग्रेनेड, १०० डिटोनेटर्स असे साहित्य जप्त करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...