आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे समर्थन करणाऱ्या तीन बलूच नेत्यांवर गुन्हा, पाकिस्तानी पोलिसांची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीमा यांनी मोदींना पूर्ण बलोच नेत्यांचा भाऊ असे संबोधले होते (फाईल) - Divya Marathi
करीमा यांनी मोदींना पूर्ण बलोच नेत्यांचा भाऊ असे संबोधले होते (फाईल)

कराची - पाकिस्ताननेतीन बलूच नेत्यांच्या विरोधात देशद्रोहासह पाच गुन्हे दाखल केले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तानबाबत केलेल्या टिप्पणीला पाठिंबा दिल्याने ही कारवाई करण्यात आली.ब्रह्मदग बुग्ती, हरबियार मारी आणि बनुक करिमा बलोच या तीन नेत्यांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. बुग्ती यांच्यासह तिन्ही नेत्यांनी मोदी यांच्या भाषणाला पाठिंबा दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरून या तिघांच्या विरोधात पाच पोलिस ठाण्यांत पाकिस्तान दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. बलुचिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर पाकिस्तान सरकार अत्याचार करत असून हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल बलुचिस्तानच्या नागरिकांनी आपले आभार मानले आहेत, असा उल्लेख उल्लेख मोदींनी भाषणात केला होता.


बलुचिस्तानबद्दल मोदींचे एेका : मजदाक
नवीदिल्ली बलूच युवा कार्यकर्ता मजदाक दिलशाद बलूच (२५) म्हणाले की, जगातील लोकांनी बलुचिस्तानबद्दल मोदींची भूमिका ऐकली पाहिजे. मोदींनी बलुचिस्तानच्या ‘मानवी संकटाचा’ उल्लेख करून ‘मोठे पाऊल’ उचलले आहे. दिल्लीत राहणारे बलूच लोक आणि भारतीयांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मजदाक सध्या भारतात आले आहेत. ते निर्वासित असून सध्या कॅनडात दोन भाऊ आणि पत्नीसोबत राहतात. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना २०१४ मध्ये कॅनडाने राहण्याची परवानगी दिली.

स्वातंत्र दिनी मोदी म्हणाले, बलुचिस्तान व पाकव्याप्तमधील नागरिकांचे खूप आभार
- मोदी लाल किल्ल्यावरुन भाषण देताना म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तान, गिलगिट, पाकव्याप्त भागातील लोकांनी माझे खूप आभार मानले आहेत. मला शुभेच्छा दिल्या आहेत.
- दूरवर लोक राहतात. मी जो भाग कधीच पाहिला नाही, जेथील लोकांना कधीच भेटलो नाही, ते पंतप्रधानांप्र‍ती आदर व्यक्त करतात. हा माझ्या सव्वाशे कोटी नागरिकांचा सन्मान आहे. मी गिलगिट, बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्‍मीरमधील लोकांचे खरेच मनापासून आभार मानतो.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काही बलूच नेत्यांनी केली होती मोदींची प्रशंसा...
बातम्या आणखी आहेत...