आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#karachiattack : 47 ठार, 9 जखमी, घटनास्थळी ISIS चा कागद, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानमधील प्रमुख शहर असलेल्या कराचीमध्ये दहशतवाद्यांनी एका बसवर केलेल्या हल्ल्यात सुमारे 47 जण ठार तर 9 जण जखमी झाले. कराचीतील सफुरा चौक परिसरात हा हल्ला करण्यात आला. दोन ते तीन मोटरसायकलवरून आलेल्या पाच ते सहा दहशतवाद्यांनी बस रस्त्यात अडवून अंधाधुंद गोळीबार केला. मात्र सुमारे 50 लोक ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. तहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, घटनास्थळी ISIS चा कागद सापडल्याने त्याही दिशेने तपास केला जात आहे.
अल अझहर गार्डन कॉलनीची ही बस असल्याची माहिती मिळली आहे. या हल्ल्यात ठार झालेले सर्व प्रवासी इस्मायली कम्युनिटीचे होते. 52 प्रवासी क्षमता असलेल्या या बसमधून 50 ते 60 लोक प्रवास करत होते, अशी माहिती मदत कार्य करणा-या अधिका-यांनी दिली आहे. हल्लेखोर गोळीबारानंतर लगेचच फरार होण्यात यशस्वी झाले. बचाव कार्यासाठी बचाव दलातील जवान घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य वेगाने सुरू केले आहे. या हल्ल्यातील पीडितांना लगेचच जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर असल्याचीही माहिती मिळत आहे. मृतांमध्ये 25 महिला आणि 16 पुरुषांचा समावेश आहे.
बसमध्ये घुसताच बेछूट गोळीबार
एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या महितीनुसार, तीन मोटरसायकलवर बसलेल्या आठ दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला. त्यात काहींना इजा झाली. पण फोटो आणि व्हिडिओमध्ये मात्र बसवर गोळ्यांच्या खुणा दिसत नसल्याने हल्लेखोरांनी बसमध्ये धुसून बेछूट गोळीबार केला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एका पोलिस अधिकाऱ्यानेही नाव न सांगण्याच्या अटीवर दहशतवाद्यांनी बसमध्ये घुसून गोळीबार केल्याचे सांगितले आहे. आधी त्यांनी बस थांबवत बाहेरून गोळीबार केला. त्यानंतर आत घुसून काहीही विचार न करता बेछूट गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोणी हल्ल्यातून वाचले तर नाही याची खात्रीही दहशतवाद्यांनी केली, अशी माहितीही मिळाली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, हल्ला झालेल्या बसचे आणि घटनास्थळाचे PHOTO