आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलसुम शरीफ यांच्याविरोधात 43 उमेदवार; मतदान शांततेत; पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागल्यामुळे रिक्त झालेल्या लाहोरच्या एनए-१२० मतदारसंघात रविवारी ही मतदान प्रक्रिया पार पडली. शरीफ यांच्या पत्नी कुलसुम पोटनिवडणूक लढवत आहेत. रात्री उशिरा २२० पैकी १३४ मतदान केंद्रासंबंधीच्या मतमोजणीत कुलसुम यांनी तेहरिक-ए-इन्साफच्या यास्मिन रशीद यांच्यावर आघाडी घेतली होती. 
 
कुलसुम यांना ३५ हजार ६०० तर यास्मीन यांना २८ हजार मते पडली होती. मतमोजणीचे संपूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. वास्तविक सध्या कुलसुम वैद्यकीय उपचारासाठी ब्रिटनमध्ये आहेत. त्यांच्या मुख्य विरोधक डॉ. यास्मिन रशीद यांनी मतदान प्रक्रियेवर समाधान व्यक्त केले आहे. शरीफ यांनी या मतदारसंघातून आतापर्यंत तीन वेळा विजय मिळवला होता. यावेळी शरीफ यांची मुलगी मरयम नवाज यांनी पोटनिवडणुकीचे नेतृत्व केले होते. त्यांची भाषणेही गाजली होती.  लाहोरमधील निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला मिळतो?  मरयम यांच्यावर जनता विश्वास ठेवते का? शरीफ व त्यांच्या कुटुंबाला जनतेचा पाठिंबा आहे की नाही, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. कुलसुम यांच्याविरोधात ४३ उमेदवार उभे राहिले होते.  
दरम्यान, काही भागात सत्ताधारी पीएमएल (एन) व तेहरिकच्या कार्यकर्त्यांनी परस्परांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून वातावरण चांगलेच तापवले. शरीफ यांनी या मतदारसंघातून आतापर्यंत तीन वेळा विजय मिळवला होता. १९९० पासून ते विजयी होत आले.  यंदाच्या निवडणुकीत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच बायोमेट्रिक मतदार पडताळणी यंत्रांचा वापर करण्यात आला. त्यासाठी १०० बायोमेट्रिक यंत्रे लावण्यात आली होती. ३९ मतदान केंद्रे होती. दरम्यान, लाहोर मतदारसंघात सुमारे ३ लाख २० हजारावर नोंदणीकृत मतदार आहेत. 
 
व्यवस्थेच्या नावाने बांेब  
लाहोरमधील पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असले तरी पाकिस्तानचा निवडणूक आयोग मात्र व्यवस्था आणि नियोजनाच्या पातळीवर ढिम्म दिसून आला. त्यामुळेच अनेक मतदान केंद्रांवर विजेचा अभाव असल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. त्याशिवाय काही केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया अतिशय मंद आहे. मतदारांनी ट्विटरवरून अशा प्रकारची कैफियत मांडली आहे. 
बातम्या आणखी आहेत...