आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये आणखी ५ फासावर, सत्र सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आणखी ५ कैद्यांना बुधवारी फासावर लटकवण्यात आले. मंगळवारी ९ जणांना फाशी दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीही हे सत्र कायम राहिले. सर्व फाशीच्या शिक्षांची अंमलबजावणी लाहोर, बहवालपूर, तोबा तेक सिंग, मीनावली, डेरा गाझी खान जिल्ह्यामध्येच होत आहे. हे सर्व जिल्हे पंजाब प्रांतात येतात. पाकच्या गृहमंत्रालयानेही या फाशींविषयी अधिकृत निवेदन प्रसारित केले आहे. बुधवारी शिक्षा देण्यात आलेल्या कैद्यांवर खुनाचा आरोप सिद्ध झालेला होता. डिसेंबर २०१४ पासून आतापर्यंत २६० कैद्यांना फाशी दिली.संयुक्त राष्ट्र संघटनेचा याला आक्षेप आहे.