आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात पोलिओ पथकावर दहशतवादी हल्ला: दोघांना ठार मारले, तिघांचे अपहरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर - अफगाणिस्तानच्या सीमेलगत पाकिस्तानच्या आदिवासी बहुल भागात दहशतवाद्यांनी पोलिओ लसिकरणासाठी आलेल्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलिओ पथकातील 2 सदस्यांचा मृत्यू झाला. तसेच इतर 3 जणांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. गेल्या महिन्यातच पाकिस्तानच्या कराची शहरात सुद्धा अशाच प्रकारे पोलिओ पथकावर हल्ला करण्यात आला होता. 

 

- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सफी तहसीलात पोलिओ लस देण्यासाठी 7 सदस्यांचा एक समूह आला होता. त्यांच्यावरच दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दोघांचा मृत्यू झाला, तर इतर 3 जणांचे अपहरण करण्यात आले आहे. 
- उर्वरीत दोन सदस्यांनी घटनास्थळावरून पसार होऊन आपला जीव वाचवला. तसेच पोलिस मुख्यालयात जाऊन या हल्ल्याची माहिती दिली. 
- पाकिस्तानात पोलिओ मोहिमेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांना दहशतवादी नेहमीच लक्ष्य करतात. गेल्या महिन्यातच कराचीत सुद्धा अशाच प्रकारचा हल्ला झाला. 

 

का होतात हल्ले?
कराची, पेशावरसह समस्त पाकिस्तानात पोलिओ पथकांवर हल्ल्याचे प्रकार घडतात. दहशतवादी आणि स्थानिक संस्था संघटनांनी पोलिओ पथकांबद्दल अफवा पसरवल्या आहेत. पोलिओ पथक पाकिस्तान आणि एकूण मुस्लिम समाजाची नसबंदी करण्यासाठी पोलिओचा बहाणा करतात. हा एक आंतरराष्ट्रीय कट असल्याचे सांगत स्थानिकांनाही भडकावले जाते. सोबतच, पोलिओ पथक हे गुप्तहेर असून ते दहशतवाद्यांचे ठाव-ठिकाणे सुरक्षा रक्षकांना पुरवतात असेही दावे केले जातात. 

 

पोलिओची प्रकरणे

देश 2015 2016 2017
अफगाणिस्तान 20 13 13
पाकिस्तान 54 20 08
नायजीरिया 02 04 11