Home | International | Pakistan | 81 Year Old Pakistani Sentenced For 54 Months For Raping Own Daughter In UK

मरताना सांगितले पाकिस्तानी बापाचे कृत्य, DNA चाचणीत झाला धक्कादायक खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 27, 2018, 12:14 AM IST

अशरफ खान असे त्या नराधमाचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानी आहे.

 • 81 Year Old Pakistani Sentenced For 54 Months For Raping Own Daughter In UK

  लंडन - इंग्लंडच्या एका न्यायालयाने आपल्या मुलीवर बलात्कार करून 3 मुले जन्माला घालायला लावणाऱ्या 81 वर्षीय बापाला 4 वर्षे 6 महिन्यांची कैद सुनावली आहे. अशरफ खान असे त्या नराधमाचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानी आहे. निकाल देताना कोर्टाने आरोपीला अतिशय दुष्ट आणि नीच म्हटले आहे. या प्रकरणाचा खुलासा पीडित तरुणी मरताना झाला. तिने आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या पतीला यासंदर्भात सांगितले होते.


  मरताना सांगितली आपबिती...
  इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायर येथील ब्रॅडफोर्ड शहरात राहणारा अशरफ खान याला 30 वर्षांपूर्वी आपल्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. त्यानेच केलेल्या अत्याचारातून पीडितेने 3 मुलांना जन्म दिला होता. ब्रॅडफोर्ड क्राउन कोर्टात झालेल्या या सुनावणीत समोर आलेल्या माहितीप्रमाणे, पीडितेने आरोपी बापाच्या पहिल्या बाळाला जन्म दिला, त्यावेळी ती फक्त 20 वर्षांची होती. यानंतर तिने आणखी दोन बाळांना जन्म दिला. 90 च्या दशकातच पीडितेचा मृत्यू झाला. महिलेने आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये पतीसमोर या धक्कादायक घटनेचा खुलासा केला. यानंतरच पतीने आपल्या तिन्ही मुलांची डीएनए चाचणी घेतली होती. विशेष म्हणजे, डीएनए चाचणीत पत्नीचे आरोप खरे निघाले. तरीही त्या मुलांसोबत पतीचे वर्तन मुळीच बदलले नाही. ती तिन्ही मुले आजही महिलेच्या पतीसोबतच राहत आहेत.


  कारवाईत गेली 2 दशके
  - पीडितेच्या पतीने 2012 मध्ये पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. परंतु, त्यावेळी आरोपी पाकिस्तानात होता. 2016 मध्ये आरोपी बाप ब्रिटनला पोहोचला तेव्हा त्याची चौकशी सुरू करण्यात आली. सुरुवातीला नराधमाने आपल्यावर लावलेले आरोप स्वीकारलेच नाहीत. परंतु, पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांनी सुद्धा या नराधमाला नीच आणि दुष्ट संबोधले आहे. कित्येक वर्षे त्या मुलीने तुझा अत्याचार सहन केला आणि मरताना सर्व सांगून गेली अशा शब्दात कोर्टाने त्याला खडेबोल सुनावले.
  - पीडितेचा विवाह 80 च्या दशकात झाला होता. ती आपल्या पती आणि वडिलांसोबत ब्रॅडफोर्डला शिफ्ट झाली होती. तिने एकूणच 3 मुलांना जन्म दिला होता. ब्रिटनमध्ये अशा प्रकरणांत 2 वर्षांची शिक्षा दिली जाते. परंतु, त्या नराधमाने आपल्या मुलीवर तीनदा बलात्कार केला होता. त्यामुळे, प्रत्येक गुन्ह्यासाठी त्याला 18 महिन्यांप्रमाणे 54 महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे.

Trending