Home | International | Pakistan | Pakistani Hindu Conversion In Islam This Video Is Horrible Truth पाकिस्तानात हिंदूवर अत्याचार, बळजबरी धर्मपरिवर्तन

हिंदूंचा सफाया करण्यासाठी पाकिस्तानात सुरू आहे हे काम, व्हिडिओतून दिसले भयंकर सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 30, 2018, 04:28 PM IST

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मातली जिल्ह्यात 25 मार्च रोजी 500 हिंदूंना बळजबरी मुसलमान बनवण्यात आले.

 • Pakistani Hindu Conversion In Islam This Video Is Horrible Truth पाकिस्तानात हिंदूवर अत्याचार, बळजबरी धर्मपरिवर्तन

  इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मातली जिल्ह्यात 25 मार्च रोजी 500 हिंदूंना बळजबरी मुसलमान बनवण्यात आले. धर्म परिवर्तनचा हा खेळ खेळला पाकचा माजी राष्ट्रपती- लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ याचा पक्ष ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगने. व्यासपीठावर मुख्तयार जान सरहदी, पीर सज्जाद जान सरहदी आणि पीर साकिब जान सरहदी यांनी कलमा पढला आणि समोर उभ्या 500 हिंदूंना पुनरुच्चार करायला सांगितले. त्यांनी पुनरुच्चार केल्यानंतर त्यांना मुसलमान घोषित करण्यात आले. या आयोजनावर असेच म्हणण्यात आले होते की, या हिंदूंनी आपल्या मर्जीने धर्म बदलला आहे, परंतु हकिगत वेगळीच आहे. या धर्म परिवर्तनाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात हिंदूंच्या चेहऱ्यावर लाचारी स्पष्ट दिसते. या व्हिडिओत मंचावर उपस्थित लोकांमधून आवाज येताना दिसत आहे... ते म्हणताहेत - 'अब मैं कलमा पढूंगा, तुम सब अलफाज दोहराओगे, तेज आवाज में, तेज आवाज में पढ़ो, कलमा पढ़कर तुम सब मुसलमान बन गए, मैं तुम सबको मुबारकबाद देता हूं, अल्लाह तुम्हें इस्लाम में कबूल फरमाए'


  ज्या हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले ते कोण आहेत?
  हे 500 हिंदू भारतातून पाकिस्तानात गेलेले आहेत. सिंध प्रांतातील हे हिंदू तेथील अत्याचारामुळे त्रस्त होऊन भारतात आले होते, परंतु त्यांना पक्का व्हिसा मिळाला नाही. मजबुरीने त्यांना पाकिस्तानात परतावे लागले, परंतु तेथे जाताच त्यांच्यावर हे संकट ओढवले. 25 मार्च रोजी बळजबरी धर्म परिवर्तनाचा हा खेळ खेळण्यात आला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान नॅशनल असेम्बलीमध्ये हिंदू नेता लाल चंद माल्ही यांनी पाकिस्तानातील हिंदूंचे दु:ख काहीसे असे व्यक्त केले- 'हमें हिंदू-हिंदू कहकर चिढ़ाते हैं। हम तो पाकिस्तानी हैं न, तो फिर ये क्यों हमें पाकिस्तानी नहीं कहते।'

  पाकिस्तानात असा होतोय हिंदूंचा सफाया
  येथे सिस्टिमॅटिक पद्धतीने हिंदूंचा सफाया केला जाता आहे. कधीकाळी या देशाची एक चतुर्थांश लोकसंख्या हिंदू होती. ते आज 2 टक्केही उरले नाहीत. 1947 मध्ये येथे 23 टक्के हिंदू राहत होते... आज फक्त 1.6 टक्के आहेत. हिंदूंसाठी येथील आयुष्य खडतर झाले आहे, जगणे म्हणजे संकट ओढवून घेणे. अनेकदा बातम्या आल्या की, धर्म परिवर्तनासाठी हिंदूंच्या मुली दिवसाढवळ्या उचलून नेल्या. 20 मार्च रोजी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतही पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दा उचलण्यात आला होता. वर्ल्ड सिंधी काँग्रेसच्या चेअरपर्सन रुबिना शेख म्हणाल्या की, सिंधमध्ये हिंदूंचे बळजबरी धर्मपरिवर्तन केले जात आहे.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ

 • Pakistani Hindu Conversion In Islam This Video Is Horrible Truth पाकिस्तानात हिंदूवर अत्याचार, बळजबरी धर्मपरिवर्तन

Trending