आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारचा चित्रपट पॅडमॅन पाकमध्ये बॅन, सेंसॉर बोर्ड म्हणाले हे आमच्या संस्कृती विरोधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - अक्षय कुमारचा चित्रपट पॅडमॅन पाकिस्तानात रिलीज होणार नाही. त्याठिकाणच्या फेडरल सेंसॉर बोर्ड म्हणजेच, FCB ने हा चित्रपट बॅन करण्याचा निर्णय केला आहे. बोर्डाचे सदस्य ईशाक अहमद म्हणाले, आम्ही वितरकांना अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी परवानगी देऊ शकत नाही. हा चित्रपट आमच्या संस्कृती आणि परंपरेच्या विरोधी आहे. या चित्रपटात महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित अनेक प्रकारची चर्चा करण्यात आली आहे. ज्या वाईट रुढी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट आहे. 


काय म्हटले पाकिस्तान सेंसॉर बोर्डाने 
- न्यूज एजन्सीशी बोलताना पाकिस्तान सेंसॉर बोर्डचे सदस्य ईशाक अहमद म्हणाले की, पाकिस्तानात असे चित्रपट रिलीज करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. ते म्हणाले, हे चित्रपट आमच्या परंपरा आणि संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही डिस्ट्रीब्युटर्सला परवानगी कशी देऊ शकतो. 
- हा चित्रपट आर. बाल्किने दिग्दर्शित केला आहे. अक्षय, राधिका आणि सोनम यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. 
- पाकिस्तानच्या सेंसॉर बोर्डाने म्हटले, आमच्या संस्कृतीत, समाजात आणि धर्मातही अशा गोष्टीला जागा नाही.

बातम्या आणखी आहेत...