Home | International | Pakistan | Dawood, Hafiz, in the list of terrorists in the Security Council

सुरक्षा परिषदेच्या अतिरेकी यादीत दाऊद, हाफिजसह 139 पाकिस्तानींचा समावेश

वृत्तसंस्था | Update - Apr 05, 2018, 02:00 AM IST

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने अतिरेकी व अतिरेेकी संघटनांची नवी यादी जारी केली. त्यात मुंबई हल्ल्याचा मास्टर मा

  • Dawood, Hafiz, in the list of terrorists in the Security Council

    इस्लामाबाद- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने अतिरेकी व अतिरेेकी संघटनांची नवी यादी जारी केली. त्यात मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेसह १३९ नावे पाकिस्तानमधील आहेत. भारताचा ‘मोस्ट वाँटेड’ दाऊद इब्राहिमच्या नावाचाही यादीत समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांनुसार, दाऊदकडे अनेक नावांनी पाकिस्तानी पासपोर्ट आहेत. हे पासपोर्ट रावळपिंडी व कराचीतून जारी झाले आहेत. पाकिस्तानमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर अयमान अल जवाहिरीचे नाव आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदाचे नेतृत्व त्याच्याकडे आले आहे. जे पाकिस्तानमध्ये राहत आहेत किंवा तेथून संचालित होत आहेत किंवा पाकिस्तानच्या जमिनीचा दहशतवादी कारवायांसाठी करणाऱ्या संघटनांशी संबंधित आहेत अशांची नावे या यादीत समाविष्ट आहेत.


    लष्कर-ए-तोयबाची अनेक नावे
    संयुक्त राष्ट्रांच्या या यादीनुसार, लष्कर-ए-तोयबा वेगवेगळ्या नावांनी सक्रिय आहे. त्यात अल-मन्सुरियन, पास्बान-ए-काश्मीर, पास्बान-ए-अहले हदीथ, जमात-उद-दावा आणि फलह-ए-इन्सानियत या नावांचा समावेश आहे.

Trending