Home | International | Pakistan | Dr. Take Fazlullah in return for Afridi: Musharraf

डॉ. आफ्रिदी यांच्या बदल्यात फजलुल्ला घ्या: मुशर्रफ यांचा पाकिस्तानला सल्ला

वृत्तसंस्था | Update - May 27, 2018, 07:23 AM IST

तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजलुल्लाच्या बदल्यात डॉ. शकील आफ्रिदी यांची सुटका करून

 • Dr. Take Fazlullah in return for Afridi: Musharraf

  इस्लामाबाद - तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजलुल्लाच्या बदल्यात डॉ. शकील आफ्रिदी यांची सुटका करून त्यांना अमेरिकेकडे सोपवण्यात यावे, असा सल्ला पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानला दिला आहे. आेसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या लष्करी मोहिमेमध्ये आफ्रिदी यांचीही भूमिका होती.


  ७४ वर्षीय मुशर्रफ यांनी वॉशिंग्टनमधील ग्रेटा व्हॅन सुस्टिरिनला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केल्याचे ‘डॉन’ ने म्हटले आहे. तुम्ही राष्ट्राध्यक्ष असता तर आफ्रिदींची सुटका केली असती का ? या प्रश्नावर मुशर्रफ म्हणाले, निश्चितपणे. आफ्रिदींची सुटका केली असती. फजलुल्लाच्या बदल्यात आफ्रिदी देणे ही काही मोठी गंभीर गोष्ट नाही, असे मुशर्रफ यांनी सांगितले.


  लादेनच्या खात्म्यानंतर मात्र आफ्रिदी यांना पाकिस्तान सरकारने अटक केली होती. २ मे २०११ रोजी अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद शहरात कारवाई केली होती. आफ्रिदी यांनी अमेरिकेला या माेहिमेसाठी मदत केली होती. आफ्रिदी यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी अनेक वेळा अमेरिकेने केली होती. पेशावर शाळेवरील हल्ल्यात १५४ जणांचा मृत्यू झाला होता.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटाघाटीचे समर्थक नाहीत
  भारत-पाकिस्तान यांच्यात शांततापूर्ण संबंध निर्माण व्हावे, अशी भूमिका माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतली होती. दोन्ही देशांना शांतता हवी होती. त्यामुळे या नेत्यांनी माझ्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू ठेवण्याची आणि तोडगा काढण्याची तयारी दर्शवली होती. मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शांतता वाटाघाटीचे मुळीच समर्थक नाहीत, अशी टीका मुशर्रफ यांनी केली आहे.

Trending