आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- पाकिस्तानच्या मानवी हक्क कार्यकर्त्या व प्रसिद्ध वकील अस्मा जहांगीर यांचे निधन झाले. रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ६६ वर्षांच्या होत्या. पाकिस्तानमध्ये सरकार व लष्कराच्या चुकीच्या धोरणाचा उघड विरोध केल्याबद्दल अस्मा यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा तयार झाली होती. पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दूतावासाशी संपर्क साधण्यात मनाई केल्यानंतर अस्मा यांनी सर्वात प्रथम त्याविरोधात आवाज उठवला.
अस्मा यांनी म्हटले होते की, जाधव यांना दूतावासाशी संपर्क करू न देणे पाकिस्तानची मोठी चूक आहे. यामुळे भारतीय तुरुंगात कैद पाकिस्तानी कैद्यांच्या हक्काचेही धोके वाढतील. आपण आंतरराष्ट्रीय कायदे बदलू शकत नाही. अस्मा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या काम करण्याच्या पद्धतीवर उघड टीकाही केली होती. २०१६ मध्ये त्यांच्या एका व्हिडिओत पाकिस्तानी लष्करास ‘ताबा घेणारा गट’ व पाकिस्तानी जवानांना मूर्ख ठरवले होते. जे जनरल्स दिवसभर गोल्फ खेळतात व तिथूनच निर्णय घेतात त्यांच्यासाठी हा शब्दप्रयोग आहे, सर्वांसाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
अस्मा पाकिस्तान सर्वाेच्च न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या २०१० ते २०१२ पर्यंत या पदावर होत्या. याशिवाय त्या १९८७ ते २०११ पर्यंत पाकिस्तान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष होत्या. १९८३ मध्ये पाकिस्तानच्या झिया-उल-हक सरकारविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व केल्यानंतर ३१ वर्षीय अस्मा जहांगीर यांना देशाची ‘छोटी नायिका’,असा बहुमानही मिळाला होता.
अस्मा यांनी २९ व्या वर्षी पाक सरकारविरोधात केले आंदोलन
१९८३ मध्ये १३ वर्षांच्या एक अंध मुलीवर अत्याचार झाला होता. पीडितेलाच जिना (लग्नाआधी अवैध संबंध) होण्याच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले होते. यानंतर देशभरात सुरू झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व २९ वर्षीय अस्मा यांनी केले. त्यांनी अशा कायद्याविरोधात झिया-उल-हक सरकारला विरोध केला. या आंदोलनानंतर अस्मा यांची ओळख निर्माण झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.