आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FATF च्या Grey List मध्ये पाकचा समावेश, कारवाई करावीच लागेल; भारताकडून स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस / नवी दिल्ली - फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय संघटना Financial Action Task Force (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला समाविष्ट करण्यात आले आहे. FATF ने हा निर्णय 24 जून ते 29 जून पर्यंत झालेल्या बैठकीत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समीक्षण ग्रुपच्या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर जाहीर केले. या यादीत समाविष्ट झालेला पाकिस्तान 8 वा देश बनला आहे. इतर 7 देशांमध्ये श्रीलंका, इथियोपिया, सीरिया, त्रिनिदाद, टोबॅगो, टुनिशिया आणि येमेनचा समावेश आहे. नेमकी काय आहे ही यादी आणि पाकिस्तानवर त्याचा काय परिणाम होईल. सोबतच, यावर आलेल्या प्रतिक्रियांचा सविस्तर आढाव घेऊ...


जागतिक अर्थव्यवस्थेला घातक देश...
FATF ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून जागतिक अर्थव्यवस्थेचे समीक्षण करणे त्याचे कार्य आहे. या टास्क फोर्सकडून अशा काही देशांची यादी (ग्रे लिस्ट) तयार केली जाते. ज्यांच्या डबघाईला आलेल्या भ्रष्ट अर्थव्यवस्थेचा जागतिक अर्थव्यवस्थेला धोका आहे. अशा देशांना हे टास्क फोर्स काही महत्वाची पावले उचलण्याचे निर्देश देते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था इतकी कोलमडली आहे, की त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेला धोका आहे. पाकिस्तानने वेळीच कठोर पावले नाही उचलल्यास त्याचा फटका आंतरराष्ट्रीय मार्केटवर होईल असा इशारा देण्यात आला आहे. दहशतवाद्यांना होणारी फंडिंग, मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचार इत्यादी निकषांवर या 
टास्क फोर्सकडून ग्रे आणि ब्लॅक लिस्ट जारी केली जाते. ग्रे लिस्टमध्ये सामिल करण्यात आलेला पाकिस्तान 9 वा देश आहे. 


निर्णयाचे भारताकडून स्वाग
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फ्रान्स येथील एफएटीएफच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पाकिस्तानने यापूर्वी सुद्धा एफएटीएफला निर्धारित टास्क पूर्ण करणार असे आश्वासन दिले होते. परंतु, पाकिस्तानने त्याची पूर्तता अद्याप केली नाही. उलट, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना होणारी फंडिंग सुद्धा वाढली आहे. पाकिस्तानात अजुनही मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदसह जमात-उद-दावा, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद अशा दहशतवादी संघटना वित्तपोषण केले जात आहे. त्यामुळे, पाकिस्तानने केलेल्या कृत्यांचे हे फलित आहे. टास्क फोर्सने दिलेल्या कामांची पाकिस्तान वेळेच्या आत पूर्तता करेल अशी आम्ही अपेक्षा करतो असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 


कॅश तस्करीची कबुली, टेरर फंडिंग थांबवणार - पाकिस्तान
पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या दुखापेक्षा ब्लॅक लिस्टमध्ये टाकले नाही याचे समाधान अधिक आहे. पाकिस्तानी दैनिक एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, सरकारने सीमापलिकडून होणाऱ्या कॅशच्या तस्करीवर आळा घालण्यात आलेले अपयश मान्य केले. सोबतच, दहशतवाद्यांना होणारा वित्त पुरवठा रोखणार असे आश्वासन दिले आहे. यापुढे, पाकिस्तानात होणाऱ्या टेरर फंडिंगवर पोलिस प्रशासन आणि केंद्रीय यंत्रणा सामंजस्य ठेवून काम करणार आहेत. टेरर फंडिंग नेमकी कुणाकडून कुणाला होत आहे याची सविस्तर चौकशी केली जाईल. सोबतच यातील दोषींना कठोर शिक्षा मिळवून देणार असेही पाकिस्तानने आश्वस्त केले आहे. ऑक्टोबर 2017 पासून पाकिस्तानने 177 संस्था, संघटना आणि व्यक्तींचे बँक खाते सील केले. त्यातून 4.82 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत असा दावा सुद्धा पाकिस्तानने केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...