आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णाकुमारी कोल्ही पाकच्या पहिल्या दलित महिला सिनेटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृष्णा कुमारी यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. - Divya Marathi
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृष्णा कुमारी यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली होती.

कराची - पाकिस्तान संसदेमध्ये सर्व मुस्लिमच असतात असे नाही तर हिंदूंनाही पार्लमेंटमध्ये स्थान मिळत असते. याचे ताजे उदाहरण कृष्णा कुमारीच्या रुपाने समोर आले आहे. 39 वर्षांची कृष्णा कुमारी कोहली ही दलित हिंदू महिला सीनेटर म्हणून निवडली गेली आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) त्या सदस्य आहेत. सामाजिक कामाच्यानिमित्ताने त्यांचा पक्षाशी संबंध आला होता. पाकिस्तानातील मीडियानुसार, कृष्णा कुमारी यांनी सिंध प्रांतातील राखीव जागेवरुन विजय प्राप्त केला आहे. कृष्णा कुमारी यांच्याआधी रत्ना भगवानदार चावला या सीनेटरम्हणून निवडून आल्या होत्या. मात्र त्या दलित नव्हत्या. दलित महिला सीनेटर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

 

कोण आहे कृष्णा कोहली ?
- कृष्णा कोहली यांचा जन्म 1979 मध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका गरीब कुटुंबात झाला.
- कृष्णा यांना त्यांच्या बालपणी कुटुंबीयांसोबत तीन वर्षे उमेरकोट येथील जमीनदाराच्या खासगी तुरुंगात काढावी लागली होती. येथे त्यांना वेठबिगार म्हणून काम करावे लागले होते. 
- कृष्णा कुमारी यांचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले. लालचंद यांच्यासोबत लग्न झाले तेव्हा त्या नवव्या वर्गात शिकत होत्या. 
- लग्नानंतरही कृष्णा कुमारी यांनी शिक्षण सुरु ठेवले होते. 2013 मध्ये सिंध विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 

 

असा झाला राजकारणात प्रवेश?
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृष्णा यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. त्या पीपीपीसोबत काम करु लागल्या. त्यांना यूनियन कौन्सिल ऑफ बेरानोचे अध्यक्ष करण्यात आले. या काळात त्यांनी गरीब आणि निराधार लोकांसाठी मोठे काम केले. 
- कृष्णा कुमारी यांची सीनेटर म्हणून निवड होणे हे पाकिस्तानी महिला आणि अल्पसंख्यांकांच्या राजकीय वाटचालीतील मैलाचा दगड ठरणार आहे. 

 

पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहात झाली निवड 
- पाकिस्तान संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील 52 सदस्य निवृत्त झाल्याने येथे निवडणूक झाली. 52 जागांसाठी नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन, पीपी आणि अपक्षांसह 130 उमेदवार रिंगणात होते. 
- 52 जागांसाठी प्रांत आणि राज्याच्या सर्व आमदारांनी मतदान केले. 
- या निवडणुकीत सत्ताधारी 'पीएमएल-एन'ला 15 जागा मिळाल्या आहेत. या 15 जागांसह पीएमएल-एन आता वरिष्ठ सभागृहातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष झाला आहे. 

 

स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबातील आहे कृष्णा कुमारी 
- कृष्णा कुमारी या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा रुपालो कोहली हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी अनेकदा इंग्रजांशी दोन हात केले होते. 1857 मध्ये रुपालो कोहली यांनी सिंध प्रांतात अनेकदा इंग्रजांवर हल्ले केले होते. त्यांना ब्रिटीश सैनिकांनी अटक केली आणि 22 ऑगस्ट 1858 साली फाशीची शिक्षा झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...