Home | International | Pakistan | Former PM Of Pakistan Nawaz Sharif Luxurious Life Before Jail

सध्या Jail मध्ये आहेत पाकचे माजी PM नवाज, एकेकाळी राहायचे इतक्या आलीशान बंगल्यात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 10:29 AM IST

पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत नेते असलेले नवाज शरीफ देशातील 5 वे सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत.

 • Former PM Of Pakistan Nawaz Sharif Luxurious Life Before Jail

  इंटरनॅशनल डेस्क - पनामा पेपर लीकमध्ये नाव समोर आल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पाकिस्तानच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2011 मध्ये त्यांची वैयक्तित संपत्ती 16.6 कोटी रुपये होती. ती 2015 मध्ये 2 अब्ज रुपये झाली. त्यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. ते सध्या पोलिसांच्या ताब्यात असून आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत. पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत नेते असलेले नवाज शरीफ देशातील 5 वे सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत. सध्या पोलिसांच्या तावडीत असलेले शरीफ आजही आपल्या आलीशान लाइफस्टाइलमुळे ओळखले जातात. त्यांच्या बंगल्याच्या आजही पाकिस्तानात चर्चा आहेत.

  असा आहे नवाज शरीफांचा रायविंड बंगला
  लाहोरच्या रायविंडजवळ जट्टी उमरा परिसारत हा आलिशान बंगला आहे. नवाझ यांचे रायविंड पॅलेस सुमारे 1700 एकर परिसरात पसरले आहे. तर नुसता पॅलेस तब्बल 300 एकरात उभारला आहे. यात एक भव्य पॅलेस असून आजूबाजूला मोठमोठ्या बागा आहेत. रॉयल रेसिडंटमध्ये 3 ड्रॉईंग रुम आणि स्विमिंग पूल आहेत. नवाझ यांची आई, पत्नी आणि मुलगी यांच्या प्रवेशासाठी खास गेट आहे. पाकिस्तानमधील सर्वांत मोठ्या आणि आलिशान बंगल्यांमध्ये नवाझ यांच्या बंगल्याचा समावेश होतो. या बंगल्या प्रत्येक प्रवेशद्वारा शेजारी सिंहांचे पुतळे बसवण्यात आले आहेत.

  इतकी आलीशान होती लाइफ
  नवाझ शरीफ पाकिस्तानचे पहिले नेते होते जे तीन वेळा पंतप्रधान बनले. राजकीय करियरसोबतच लग्झरी लाईफस्टाईलसाठी नवाज यांना ओळखले जाते. ते पाकिस्तानचे 5 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकून संपत्ती 1.4 बिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,886 कोटी रुपये आहे. याशिवाय नवाज यांच्याकडे अनेक प्रॉपर्टीज सुद्धा आहेत. ते अनेक साखर कारखान्यांचे मालक आहेत. एका स्टील कंपनीचे ते संस्थापक सुद्धा आहेत. त्यांचे वडिलही उद्योजक होते.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, या आलीशान बंगल्याचे Inside Photos...

Trending