आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लादेनला संपवण्यासाठी पाकच्या लष्करप्रमुखांची अमेरिकेबरोबर डील! हेराचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अमेरिकेवर 9-11 चा हल्ला करणारा दहशतवादी अल कायदाचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने 2 मे 2011 मध्ये अबोटाबाद येथे एक मोहीम राबवत ठार केले होते. पण या ऑपरेशनबाबत नेहमीच संशय व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकेने लादेनला शोधले की, पाकिस्ताननेच लादेनचा पत्ता अमेरिकेला सांगितला असेही म्हटले जाते. त्यात आता पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख अशफाक कयानी यांच्यावर एक आरोप होत आहे. कयानी यांनी अमेरिकेला लादेन याचा पत्ता सांगितल्याचा दावा एका हेराने केला आहे. 


अबोटाबाद येथे झालेल्या ऑपरेशनच्या दोन दिवसांपूर्वी कयानी यांनी अमेरिकेच्या अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे हा काहीतरी कट असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे माजी प्रमुख असद दुर्राणी आणि भारतीय गुप्तचर संस्था रॉचे माजी प्रमुख एएस दुलत यांच्यातील एका चर्चेवरून हा दावा करण्यात आला आहे. दुर्राणी असे म्हटले आहेत की, अमेरिकेचे हेलिकॉप्टर देशाच्या सीमेत 150 किमीपर्यंत येतात आणि कोणाला काही कळतही नाही, असे कसे होते? आमच्यावर अक्षम असल्याचा आरोप लागला. पण मोबदल्यात आम्हाला काय मिळाले, हे मला जाणून घ्यायचे आहे. 


या पुस्तकात कयाणी यांच्या भेटीबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार 8 एप्रिलला कयाणी यांनी सेंटकॉम (अमेरिकन सेंट्रल कमान्ड) चे तत्कालीन प्रमुख जनरल जेम्स मॅटिस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी 20 एप्रिलला जॉइंट चीफ यांची भेट घेतली होती. तर 26 एप्रिलला त्यांची भेट अफगाणिस्तानातील तत्कालीन कमांडर जनरल डेवीड पेट्रॉयसबरोबर झाली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी अमेरिकेने 29 एप्रिलला ओसामा बिन लादेन असलेल्या ठिकाणी हल्ला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर 2 मे रोजी ऑपरेशनमध्ये लादेनचा खात्मा करण्यात आला. 

 

कयानी यांनी पैसे घेऊन माहिती दिल्याबाबत दुर्राणी म्हणाले की, कयाणी माझा चांगला विद्यार्थी होता. निवृत्तीनंतर तो मला भेटला नाही. त्यामुळे खरे काय हे मला विचारताच आले नाही. मला जर हे सर्व पैशासाठी झाले आहे असे कळले तर मीच त्याच्या विरोधात मोहीम सुरू करेल. 

 

आयएसआयचे माजी प्रमुख असद दुर्राणी आणि भारतीय गुप्तचर संस्था रॉचे माजी प्रमुख एएस दुलत यांच्यातील चर्चा पुढील स्लाइडवर...


 

बातम्या आणखी आहेत...