Home | International | Pakistan | Imran Khan On The Verge Of Becoming Pakistan PM Worth 38 Crore And Has No Car

पाकिस्तानचे PM होत आहेत इम्रान खान, तरी एकही कार नाही? जाणून घ्या त्यांची संपत्ती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 12:23 PM IST

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी क्रिकेटर आणि पीटीआयचे इम्रान खान सर्वात मोठे नेते म्हणून समोर आले आहेत.

 • Imran Khan On The Verge Of Becoming Pakistan PM Worth 38 Crore And Has No Car

  इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी क्रिकेटर आणि पीटीआयचे इम्रान खान सर्वात मोठे नेते म्हणून समोर आले आहेत. त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए-इन्साफ सद्यस्थितीला सर्वातम मोठा पक्ष आहे. क्रिकेटर ते पाकिस्तानचे पंतप्रधान पदाच्या मार्गावर असलेले इम्रान यांनी नुकतेच आपल्या संपत्तीचा दाखला निवडणूक आयोगाकडे जमा केला होता. त्यानुसार, पाकिस्तानच्या भावी पंतप्रधानांकडे 3.8 कोटी पाकिस्तानी रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांनी ही माहिती निवडणुकीत उमेदवारी अर्जासह दाखल केली होती. पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, त्यामध्ये खान यांच्याकडे 3 कोटी 86 लाख 94 हजार 493 रुपये इतका पैसा आहे.


  कमाईचे Source, परदेशी चलनांचे 4 बँक खाते...
  पीटीआय नेते खान यांनी गतवर्षी एकूण 47.76 लाख रुपयांची कमाई केली होती. त्यातून त्यांनी 1 लाख 3,763 रुपये इतका आयकर भरला आहे. त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत शेती आहे. खान 168 एकर शेतीचे मालक आहेत. त्यातून खान यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते. सोबतच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून त्यांना पेन्शन सुद्धा मिळत असते. या व्यतिरिक्त इम्रान यांच्याकडे परदेशी चलनाचे बँक खाते सुद्धा आहेत. त्यात डॉलरसाठी दोन अकाउंट असून एका खात्यात $379,760 आणि दुसऱ्यात $1,470 आहेत. खान यांच्या नावे एक ब्रिटिश पाउंडचे आणि एक युरोचे अकाउंट सुद्धा आहे. यापैकी पाउंडच्या अकाउंटमध्ये £7,068 आहेत. तर, युरोचे अकाउंट रिकामे आहे असे त्यांनी रेकॉर्डमध्ये लिहिले.


  बिझनेस नाही तरीही देशभर 14 प्रॉपर्टी...
  > इम्रान खान यांनी या वर्षी फक्त एक परदेश दौरा आपल्या पैश्यांवर केला. ते ब्रिटनला गेले होते. यासाठी त्यांनी 2.4 लाख रुपये खर्च केले. 2017 मध्ये ते तुर्कीत सुद्धा गेले होते. परंतु, 4 दिवसांचा तुर्की दौरा पूर्णपणे स्पॉन्सर होता अर्थात त्यांना एक रुपयाही खर्च करावा लागला नाही.
  > खान यांचे देशात किंवा परदेशात एकही उद्योग किंवा व्यवसाय नसल्याचे सांगितले जाते. तरीही पाकिस्तानात विविध ठिकाणी त्यांच्या 14 प्रॉपर्टी आहेत. त्यापैकी बहुतांश मालमत्ता त्यांना वडिलोपार्जित मिळाल्या असा दावा इम्रान करतात. उल्लेखनीय बाब म्हणजे, बनी गाला हा त्यांचा फक्त एक बंगला 1 कोटी 14 लाख 71 हजार रुपयांचा आहे. परदेशात आपली संपत्ती नाही असा दावा ते करतात.


  कार एकही नाही..!
  पाकिस्तानचा सर्वात मोठा पक्ष बनलेल्या पाकिस्तान तहरीक ए-इन्साफचे सुप्रिमो खान यांनी आपल्याकडे एकही कार नाही असा दावा केला. त्यांनी निवडणुकीच्या कागदपत्रांमध्ये कारचा रकाना रिकामा ठेवला आहे. आपल्या संपत्तीचे वारसदार पत्नी बुशरा बीबी, माजी पत्नी जेमिनाकडून जन्माला आलेली दोन मुले कासिम आणि सुलेमान आहेत असे त्यांनी नोंदवले आहे. आपल्या दोन्ही मुलांची कमाई किंवा पत्नीच्या संपत्तीचा उल्लेख त्यांनी केलेला नाही.

Trending