Home | International | Pakistan | Pakistan Election Results Live: imran khan will be next prime minister of pakistan Breaking News And Live Updates

पाकचा नवा 'कॅप्टन' इम्रान खान, म्हणाले- अल्लाहने 22 वर्षांनी दिली संधी; दहशतवादी हाफिझला जनतेने नाकारले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 06:04 PM IST

इम्रान खान सत्ता स्थापनेच्या तसेच पंतप्रधानपदाच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहेत.

 • Pakistan Election Results Live: imran khan will be next prime minister of pakistan Breaking News And Live Updates
  > ही निवडणूक 'नवा पाकिस्तान' मुद्द्यावर लढण्यात आली.
  > सर्व सर्व्हेंमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफला यश मिळणार असल्याचे दाखवण्यात आले होते.
  > पीएमएल-एन, पीपीपी आणि हाफिझ सईदने निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला.

  इस्लामाबादहून सय्यद मसरूर शहा आणि मोना आलम - पाकिस्तानात बुधवारी 272 जागांसाठी झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालांवरून इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) हा सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ गेलेला दिसत आहे. पक्ष 115 जागा मिळवून सर्वात पुढे आहे. बहुमतापासून ते फक्त 22 जागांनी दूर आहेत. बहुमतासाठी 137 जागा आवश्यक आहेत. नवाझ शरीफ यांचे बंधु शहबाज यांच्या नेतृत्वात निवडणुकीत उतरलेली पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) 60 जागांवर आघाडी मिळवलेली आहे. बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे उमेदवार 35 जागांवर आघाडी मिळवून आहेत. दहशतवादी हाफिझ सईदने अल्लाह-ओ-अकबर तहरीक (एएटी) च्या बॅनरखाली 265 उमेदवारांना निवडणुकीत उतरवले होते, परंतु त्याला एकाही जागेवर आघाडी मिळाली नाही.

  50 ते 55 टक्के मतदानाचा अंदाज

  वृत्तसंस्थेनुसार, 2015 च्या सर्वसाधारण निवडणुकीप्रमाणेच याही वेळी 50% ते 55% मतदान झाले आहे. पाकिस्तानात 10 कोटी 50 लाख मतदार आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत एकूण 342 जागा आहेत. 60 जागा महिला आणि 10 अल्पसंख्यकांसाठी राखीव आहेत. 4 प्रांत- पंजाब, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्येही नवे सरकार निवडून आले.

  21 वर्षांपूर्वी झाले होते डिपॉझिट जप्त, आता बनणार पंतप्रधान

  पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे इम्रान खान सत्ता स्थापनेच्या तसेच पंतप्रधानपदाच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहेत. त्यांच्या पक्षाला 113 जागांवर आघाडी मिळालेली आहे. 1992 चा क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्याच्या 4 वर्षांनंतरच इम्रानने राजकारणात एंट्री घेतली होती. यानंतर 1997 मध्ये त्यांनी पहिली सर्वसाधारण निवडणूक लढली. 21 वर्षांपूर्वी झालेल्या या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 7 जागांवर निवडणूक लढली, परंतु या सर्व जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. इम्रान स्वत:ला सुपरस्टार मानायचे, परंतु या निवडणुकीने त्यांचा समज चुकीचा ठरवला होता.

  2018 च्या निवडणुकीत इम्रान खान 5 जागांवर उभे होते. यात एनए-35 (बन्नू), एनए-53 (इस्लामाबाद-2), एनए-95 (मियांवाली-1), एनए-131 (लाहौर-9), एनए-243 (कराची ईस्ट-2) या मतदारसंघांचा समावेश आहे. इम्रान यांना 4 जागांवर आघाडी आहे, परंतु एनए-53 (इस्लामाबाद-2) जागेवर ते मागे पडले आहेत.

  2002 मध्ये उघडले होते खाते:

  2002 मधील निवडणूकही इम्रान खानसाठी खास नव्हती. यात इम्रानला मियांवाली जागेवर विजय मिळाला होता, परंतु त्यांच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. 2008 च्या सर्वसाधारण निवडणुकीवर इम्रान खानने बहिष्कार केला होता. त्यांचा आरोप होता की, निवडणुकीत अनियमितता केली जात आहे.

  2013 मध्ये पीटीआय बनला दुसरा मोठा पक्ष:
  या निवडणुकीत इम्रान खानने 4 जागांवरून निवडणूक लढली. तीन जागांवर त्यांना विजय मिळाला होता, परंतु लाहोरमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यादरम्यान पाकिस्तानी जनतेत इम्रान खानचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला होता. पंजाबात त्याच्या सभांना प्रचंड गर्दी पाहून याचा अंदाज येतो. एका निवडणूक सभेदरम्यान ते लिफ्टमधून पडून जखमी झाले होते. दुखापतीनंतर सहानुभूतीचाही त्यांना फायदा झाला होता.

  हुकूमशहा झिया उल हक त्यांना कॅबिनेट मंत्री बनवणार होते :
  1987 मध्ये इम्रान खान क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात होता. तत्कालीन लष्करी हुकूमशहा आणि राष्ट्राध्यक्ष झिया उल हकने नॅशनल टेलिव्हिजनवर इम्रानला निवृत्तीची घोषणा परत घेण्याची विनंती केली होती. 1998 मध्ये तर हुकूमशहाने इम्रानला कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफरही दिली होती. इम्रानने खेळ कायम ठेवला आणि नंतर 1992 मध्ये टीमला वर्ल्ड कप जिंकवला. इम्रानने स्वत: आपल्या आत्मचरित्रात लिहिले की, जेव्हाही पाकिस्तान मॅच जिंकायचा, तेव्हा जनरल झिया उल हक त्यांना फोन करून शुभेच्छा द्यायचे.

  तालिबानला प्रोत्साहन देणाऱ्या ISI चीफने इम्रानला राजकारणात आणले:

  लेफ्टनंट जनरल हामिद गुल आयएसआय चीफ होते. ते एकेकाळी पाकिस्तानातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती होते. तालिबानला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. गुल यांनीच इम्रानला क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर राजकारणात येण्यासाठी प्रेरित केले आणि राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला.

  मुशर्रफची बाजू घेतली इम्रान खानने :
  1999 मध्ये सेनाध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सत्तापालट केला आणि नवाझ शरीफ सरकार बरखास्त केले. त्या वेळी पाकिस्तानातील जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष मुशर्रफविरुद्ध होते, परंतु एकटा इम्रान खान त्यांच्या बाजूने उभा होता. त्यांनी लष्करी हुकूमशाही पाकिस्तानसाठी चांगली असल्याचे सांगितले होते.

  दहशतवाद्यांशी संवाद साधायचा आहे इम्रान खानला:
  इम्रानच्या पक्षाचे तालिबानी विचारधारेच्या कट्टरपंथी समी-उल-हक संघटनेशी चांगले संबंध आहेत. ते नेहमी दहशतवाद्यांशी संवाद साधण्याच्या बाजूचे आहेत. यासाठी पाकिस्तानात त्यांच्यावर नेहमी टीकाही होते. अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना हरकत उल मुजाहिदीनने निवडणुकीपूर्वी इम्रानला समर्थन दिले होते. इम्रानच्या पक्षाच्या उमेदवारांसोबत या संघटनेच्या दहशतवाद्यांनीही फोटो काढले होते.

  हेही वाचा...

  इम्रान खानचा विजय म्हणजे भारतासाठी धोक्याची घंटा; म्हणाला होता- मोदींना कसे उत्तर देतात ते दाखवून देईन!

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 • Pakistan Election Results Live: imran khan will be next prime minister of pakistan Breaking News And Live Updates
 • Pakistan Election Results Live: imran khan will be next prime minister of pakistan Breaking News And Live Updates
 • Pakistan Election Results Live: imran khan will be next prime minister of pakistan Breaking News And Live Updates

Trending