Home | International | Pakistan | Imran Khans Victory Is Big Threat To India Read Political Analysis By 3 Experts

इम्रान खानचा विजय म्हणजे भारतासाठी धोक्याची घंटा; म्हणाला होता- मोदींना कसे उत्तर देतात ते दाखवून देईन!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 04:37 PM IST

इम्रान, लष्कर+ISI आणि कट्टरपंथीयांचा त्रिकोण तयार झाला आहे. भारतविरोधी शक्ती एकत्र आल्याने भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

 • Imran Khans Victory Is Big Threat To India Read Political Analysis By 3 Experts
  > इम्रानने निवडणूक प्रचारात मोदी आणि काश्मीरविरोधी वक्तव्ये केली.
  > एका सभेत इम्रान म्हणाला होता- मोदीला कसे उत्तर द्यायचे, ते मी नवाझला दाखवून देईन.

  इस्लामाबाद - पाकिस्तानात तहरीक-ए-इंसाफचा प्रमुख इम्रान खान (65) हा देशाचा नवा वजीर-ए-आझम (पंतप्रधान) बनणे निश्चित असल्याचे मानले जात आहे. शेजारी देशातील सत्तेतील हा बदल भारतासाठी कसा राहील? यावर पी टीव्हीच्या राजकीय पत्रकार मोना आलम सांगतात की, हा विजय मिळवूनही इम्रानवर लष्कराचा दबाव राहील. यामुळे भारताविषयी त्याची नकारात्मक भावना राहण्याचा अंदाज आहे. परराष्ट्र धोरणांचे जाणकार रहीस सिंह सांगतात की, पाकिस्तानचे सैन्य नेहमी सरकारला आपली कठपुतळी बनवू इच्छिते. इम्रान यासाठी तयार झाले. नवे काहीच होणार नाही. भारताची आव्हाने कमी होणार नाहीत, कारण इम्रान हा भारतविरोधी आहे. पाकिस्तानचे निवडणूक विश्लेषक सय्यद मसरूर शहा म्हणतात की, इम्रान निवडून आल्याने भारतासोबतचे संबंध चांगले होणार नाहीत.

  इम्रानला सैन्याने जिंकवले:
  रहीस सिंह सांगतात की, इम्रानला पाकिस्तानी लष्कराने जिंकवले आहे. पाकिस्तानच्या सैन्याची सरकार कायम कठपुतळी बनवण्याची इच्छा आहे. इम्रान यासाठी तयार होते. त्यांना कट्टरपंथींयांचेही समर्थन मिळाले. यामुळे हा इम्रान, डीप स्टेट (लष्कर+ISI) आणि नॉन स्टेट (कट्टरपंथी) यांचा त्रिकोण तयार झाला आहे. यात डीप स्टेट भारताला एक नंबरचा शत्रू मानते. नॉन स्टेट भारताला सनातन शत्रू मानतात. इम्रानही भारताला मित्र मानत नाही. यामुळे हे सर्व एकत्र आल्याने भारतासाठी धोक्याची घंटा आहे. राहिली गोष्ट नवाझ यांची तर ते भारताच्या बाजूने असूनही त्यांना सैन्यामुळे काहीच करता आले नव्हते. भ्रष्टाचार प्रकरणात नवाझ यांचे नाव नसूनही त्यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले. कारण पाक लष्करालाच त्यांना पुन्हा पंतप्रधान बनू द्यायचे नव्हते.

  कट्‌टरपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार:
  सय्यद मसरूर शहा यांनी ‘भास्कर’ला सांगितले की, या निवडणुकीत इम्रान खानला सैन्याचे समर्थन मिळाल्याची बाब अनेकदा उजागर झालेली आहे. यामुळे त्याचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंधांची अपेक्षा फोल ठरणार आहे. क्रिकेटमधून राजकारणात येणाऱ्या इम्रानने अनेक ठिकाणी जिहादींशी बातचीत सुरू केली. कंटरपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याची बाजू इम्रानने नेहमी मांडली. त्यांचे विरोधक त्यांना ‘तालिबान खान’ नावाने पुकारतात. याउलट नवाझ शरीफचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वातील पक्षांचे मागचे सरकार भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवण्याच्या बाजूने होते.

  आर्मीच्या दबावात ‘खामोश’ राहणार इम्रान:
  पीटीव्हीच्या पॉलिटिकल जर्नलिस्ट मोना आलम सांगतात की, इम्रानच्या रूपात पाकिस्तानला नवा चेहरा मिळाला आहे, परंतु वास्तवात हा लष्कराचा विजय आहे. या विजयानंतर इम्रानवर आर्मीचा दबाव राहील. यामुळे भारताप्रती त्यांचा कल नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. असे पहिल्यांदाच होत आहे, जेव्हा एखादा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एखादा खेळाडू एखाद्या देशाचा पंतप्रधान बनणार आहे. तसे या निवडणुकीत नवाझ शरीफ यांचा पक्षाला क्लीन स्वीप मिळाली असे म्हणता येणार नाही. वृत्तपत्रांच्या सर्कुलेशनवर बॅन, न्यूज चॅनलला विचार मांडण्यापासून रोखण्यासारखी अनेक कारणे या निवडणुकीत लष्कराची संलिप्तता जाहीर करतात.

  भारताविरोधी इम्रानची विचाराधारा

  नवाझवर केला भारताच्या बाजूने असल्याचा आरोप :
  मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी इम्रान खान म्हणाला होता- नवाझ शरीफने भारताच्या हितांची रक्षा केली आणि पाकिस्तानी सैन्य तसेच इतर संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मोदी आणि नवाझ यांची मैत्री आहे.

  जर युद्ध झाले तर भारताला परिणाम भोगावे लागतील:
  23 जुलैला आपल्या एका भाषणात इम्रान म्हणाले होते, ते भारतासोबत शांतता कायम ठेवण्यावर भर देईल. तरीही युद्ध झाले, तर भारताचेच सर्वात जास्त नुकसान होईल.

  सर्जिकल स्ट्राइकवर वक्तव्य :
  उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक घडवली होती. यावर इम्रान म्हणाला होता, मी नवाझला दाखवून देईन, मोदीला कसे उत्तर दिले जाते.

  कट्‌टरपंथी पक्षांचे समर्थन :
  सध्या निवडणुकीत इम्रानच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. यामुळे त्याला अपक्षांचा आधार घ्यावा लागेल. यातील काही कट्‌टरपंथी पक्षांशी संबंधित आहेत, जे भारताच्या कायम विरोधात आहेत.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

Trending