Home | International | Pakistan | imran & pti considering inviting modi includind saarc leaders for oath ceremony

शपथविधीसाठी मोदींना आमंत्रित करू शकतात इम्रान, सार्क देशाच्या नेत्यांना बोलावण्याची शक्यता

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 31, 2018, 04:14 PM IST

भारताचे नेतृत्व तयार असेल तर आम्हीही त्यांच्याशी नाते सुधारण्यासाठी तयार आहोत, असे इम्रान यांनी म्हटले होते.

 • imran & pti considering inviting modi includind saarc leaders for oath ceremony

  - 2014 मध्ये मोदींनी शपथविधी सोहळ्यासाटी नवाज शरीफ यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

  - सीमेवर फायरिंग आणि दहशतवादी हल्ल्यांच्या कारणामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा बंद आहे.

  लाहोर - पाकिस्तानचे नेते इम्रान खान हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करू शकतात. इम्रान यांचा पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्ष या सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याच्या विचारात आहे. इम्रान सोमवारी म्हणाले होते की, ते 11 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेतील. इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) ला सार्वत्रिक निवडणुकीत 116 जागा मिळाल्या आहेत. त्यांना इतर चार पक्षांसह अपक्षांचा पाठिंबा मिळण्याचीही शक्यता आहे.


  पीटीआयचे एक नेते मंगळवारी म्हणाले होते की, पक्षाची कोअर कमिटी मोदींसह सार्क देशांच्या प्रमुखांना या सोहळ्याच्या बोलावण्याच्या विचारात आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. मोदींना आमंत्रित करण्याबाबत पीटीआयचे प्रवक्ते फवाद चौधरी म्हणाले की, हा निर्णय पक्षाच्या सहमतीनंतरच घेतला जाईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोमवारी रात्री इम्रान यांच्याशी बोलत त्यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. मोदींनी अपेक्षा व्यक्त केली की, पाकिस्तानात यामुळे लोकशाहीची मुळे अधिक घट्ट होतील. इम्रान यांनी मोदींचे आभार मानत, दोन्ही देशांतील वादावर चर्चेतून तोडगा काढायला हवा असे म्हटले.


  इम्रान यांनी केला होता भारताचा उल्लेख
  निवडणुकीत विजयानंतर दिलेल्या भाषणात भारताचा उल्लेख करत इम्रान यांनी म्हटले होते की, भारताचे नेतृत्व तयार असेल तर आम्हीही त्यांच्याशी नाते सुधाऱण्यासाठी तयार आहोत. ते एक पाऊल पुढे टाकतील तर आम्ही दोन पावले पुढे टाकू. 2014 मध्ये मोदींच्या शपथविधी सोहळ्यात नवाज शरीफ सहभागी झाले होते. तर 25 डिसेंबर 2015 रोजी मोदी अफगाणिस्तानातून परतताना शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लाहोरमध्ये थांबले होते.

Trending