आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UN मध्ये भारताचे राजदूत अकबरुद्दीन यांचे ट्विटर हॅक, छायाचित्रे चोरली! लावले पाक राष्ट्रपती व झेंड्याचे फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताचे संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. त्यामागे पाकिस्तानचे हॅकर्स असावेत, असा संशय आहे.  


सय्यद यांच्या अकाउंटवरून पाकिस्तानचा ध्वज व पाकिस्तानचे पंतप्रधान ममनून हुसेन यांची छायाचित्रे शेअर करण्यात आली. त्याशिवाय सय्यद यांच्या अकाउंटमधून पडताळणी करणारी ब्ल्यू रंगातील खूणदेखील गायब झाली. परंतु काही वेळातच अकाउंट पूर्ववत झाले. मी पुन्हा परत आलो आहे, असे अकबरुद्दीन यांनी ट्विट करून सांगितले. मला शांत करण्यासाठी हॅक करणे पुरेेसे नाही. ट्विटर इंडिया व मला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.  पाकिस्तानच्या हॅकर्सनी भारताच्या संस्थांवर नेहमीच हल्ले केले आहेत. अशाच प्रकारचे आरोप पाकिस्ताननेही वारंवार केले आहेत. दरम्यान, भारताच्या गृह मंत्रालयाने संसदेत हॅकिंगच्या घटनांची माहिती दिली होती. त्यानुसार २०१६ मध्ये एकूण १९९ सरकारी संकेतस्थळे हॅक झाली होती. २०१३ पासून २०१६ दरम्यान ७०० हून अधिक सरकारी संकेतस्थळे हॅक झाली होती. पाककडून सातत्याने सायबर चोरी, हॅकिंग केली जाते. 

 

- पाकिस्तानकडून भारतीय अधिकाऱ्यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्याची ही पहिली घटना नाही. कित्येकवेळा पाकिस्तानकडून अशा कुरापती करण्यात आल्या आहेत. 
- 2016 मध्ये पाकिस्तानकडून भारताच्या तब्बल 199 सरकारी वेबसाइट्स हॅक करण्यात आल्या होत्या. याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेत दिली होती. 
- तर 2013 ते 2016 पर्यंत भारत सरकारच्या संकेतस्थळांना एकूण 700 वेळा हॅक करण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक पाकिस्तानी हॅकर्स होते. 

बातम्या आणखी आहेत...