आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी पंतप्रधानांचा इतिहास: एकाची हत्या, एकाला फाशी, 3 वेळा सैन्याने केले पदच्युत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> पाक सैन्याने 3 वेळा सत्ता उलथवली, एका पंतप्रधानाला फाशी देण्यात आली

 

इंटरनॅशनल डेस्क -  पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत. इम्रान खान यांनी पीएमएल-एनचे शाहबाझ शरीफ यांचा 176 विरुद्ध 96 मतांनी पराभव केला. पाकिस्तानच्या संसदेr पंतप्रधान निवडीसाठी शुक्रवारी मतदान झाले. इम्रान खान शनिवारी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. यानिमित्त divyamarathi.com पाकिस्तानी पंतप्रधानांचा इतिहास सांगत आहे.

 

एकालाही पूर्ण करता आला नाही कार्यकाळ

> पाकिस्तानात 1947 पासून आतापर्यंत 71 वर्षांच्या इतिहासात 17 जण पंतप्रधान (नवाझ शरीफ आणि बेनझीर भुट्‌टोंचे सर्व कार्यकाळ एकत्र) बनले आणि यापैकी कुणालाही 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. 3 वेळा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारची सत्ता उलथवून सैन्याने कब्जा केला. एका पंतप्रधानांची हत्या झाली होती, तर एकाला फाशीची शिक्षा देण्यात आली. 12 पंतप्रधानांवर वेगवेगळे आरोप ठेवून सत्तेतून त्यांना बेदखल करण्यात आले. मागच्या वर्षी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नवाझ शरीफांनाही पदावरून हाकलण्यात आले. त्यासोबतच ते पाकिस्तानच्या इतिहासातील 17वे असे पंतप्रधान बनले, ज्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

 

पहिल्या पंतप्रधानांची झाली होती हत्या

>> 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनलेले लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या करण्यात आली होती. त्यांना आपल्या कार्यकाळाची 4 वर्षे पूर्ण करता आली होती. यानंतर पंतप्रधान बनलेले ख्वाजा नजिमुद्दीन यांना फक्त 18 महिन्यांनीच 1953 मध्ये गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद यांच्या आदेशावरून पद सोडावे लागले होते. पुढचे पंतप्रधान मोहम्मद अली बोगरा बनले. या वेळीही पाकिस्तानचे नवे आणि शेवटचे गव्हर्नर इस्कंदर मिर्जा यांनी 1955 मध्ये त्यांच्या सरकारला निष्क्रिय ठरवून सत्तेतून बेदखल केले होते.

 
राष्ट्रपतिपद बनल्यानंतरही वाद सुरूच राहिला:  
>>1955 मध्ये पाकिस्तानात संविधान लागू करण्यात आला. यात गव्हर्नर पद संपुष्टात आणून इस्कंदर मिर्झा यांना पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आले. यानंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींदरम्यान वादांचे सत्र सुरू झाले. 1955 मध्ये चौधरी मोहम्मद अली पाकचे पंतप्रधान बनले. एका वर्षानंतर सप्टेंबर 1956 मध्ये त्यांनी राष्ट्रपती मिर्झा यांच्याशी वादानंतर राजीनामा दिला. यानंतर 1956 मध्ये अवामी लीगमधून निवडून आलेले हुसैन शाहिद सुहरावर्दी यांना पीएमपदी निवडण्यात आले, परंतु राष्ट्रपतींशी वादामुळे त्यांनाही एका वर्षानंतर हटवण्यात आले. इस्कंदर मिर्झांनी इब्राहिम इस्माइल चुंद्रिगर यांना पंतप्रधान बनवले, परंतु फक्त 2 महिन्यांनंतरच डिसेंबर 1957 मध्ये राजीनामा दिला. मिर्झा यांनी पाकिस्तानचे 7वे पंतप्रधान म्हणून फिरोज खान नून यांना नियुक्त केले.

 
पहिले सैन्य सत्तापालट, 15 वर्षे पंतप्रधानांशिवाय होता पाक : 
>> देशात सातत्याने बिघडणारी राजकीय परिस्थिती पाहून 1958 मध्ये जनरल अयूब खानने सैन्य सत्तापालट घडवून आणले. पंतप्रधानांना पदावरून हटवले. राष्ट्रपतींना राजीनामा देण्यासाठी मजबूर केले. यानंतर अयूब खान स्वत: राष्ट्रपती बनले आणि पंतप्रधानपद 13 वर्षांसाठी (1958 पासून ते 1971) रद्द करण्यात आले.

 
दुसरे सैन्य सत्तापालट, पंतप्रधानांना फाशी : 
>> 1971 मध्ये भारताशी युद्धात हरल्यानंतर आणि बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानात सैन्याची हुकूमशाही संपुष्टात आली आणि झुल्फिकार अली भुट्टो देशाचे राष्ट्रपती बनले. यादरम्यान नूरुल अमीन 8वे पंतप्रधान घोषित करण्यात आले, परंतु ते 13 दिवसच पदावर राहिले. त्याच्या दोन वर्षांनंतर 1973 मध्ये पाकिस्तानचे नवे संविधान लागू झाले आणि भुट्टोंनी यात स्वत:साठी पंतप्रधानपद निवडले. तथापि, 1977 मध्ये पुन्हा एकदा जनरल झिया उल-हक यांनी सैन्य सत्तापालट केले आणि स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले. 1979 मध्ये हक यांनी भुट्टोंवर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप ठेवून त्यांना सुळावर चढवले.

 
बेनझीर बनल्या पंतप्रधान, 20 महिने राहिले सरकार : 
>> 1977 पासून 1985 पर्यँत पाकिस्तानात सैन्य शासन होते. यादरम्यान सैन्यानेच 1985 मध्ये मोहम्मद खान जुनेजो यांना देशाचे 10वे पंतप्रधान बनवले, परंतु जुनेजो यांच्या राजकीय महत्वाकांक्षांमुळे सैन्याने मे 1988 मध्ये त्यांचे सरकार हटवले. ऑगस्ट 1988 मध्ये झिया-उल-हक यांच्या मृत्युसोबतच देशात सैन्य सत्ता संपुष्टात आली आणि निवडणुकीत झुल्फिकार भुट्टो यांची कन्या बेटी बेनझीर भुट्टो यांना पंतप्रधान पद मिळाले. त्यांची सरकार फक्त 20 महिनेच टिकले. 1990 मध्ये राष्ट्रपती गुलाम इशहाक खान यांनी त्यांना सत्तेतून बेदखल केले. 1990 मध्ये नवाझ शरीफ पाकिस्तानचे 12वे पंतप्रधान बनले. 1993 पर्यंत सरकारमध्ये राहिल्यानंतर इशहाक खान यांनी त्यांचेही सरकार पाडले. 1993 पासून 1999  पर्यंत नवाझ शरीफ 2 वेळा आणि बेनझीर भुट्टो एक वेळा सत्तेत राहिल्या.

 
तिसरे सैन्य सत्तापालट, 11 वर्षांत बदलले 7 पंतप्रधान : 
>> 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर पाकिस्तानचे तत्कालीन आर्मी चीफ जनरल परवेझ मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि नवाझ सरकारला बेदखल केले. ही आणीबाणी 3 वर्षे राहिली, यानंतर 2002 मध्ये देशात पुन्हा निवडणुका झाल्या. त्यात 13वे पंतप्रधान म्हणून जफरुल्लाह खान जमाली यांनी शपथ घेतली. यानंतर 2004 मध्ये चौधरी सुजात हुसैन पंतप्रधान बनले. फक्त एक महिना 27 दिवसांनंतर पाकिस्तानचे शौकत अजीज 15वे पंतप्रधान म्हणून भेटले. 2008 मध्ये मुशर्रफ यांच्या राष्ट्रपती पद सोडल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ची सत्ता स्थापन झाली. पंतप्रधानपदी निवडले गेलेले युसूफ रझा गिलानी 2012 पर्यंत 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पाकिस्तानचे दुसरे दीर्घ कार्यकाळाचे पंतप्रधान बनले. सुप्रीम कोर्टाच्या अवज्ञेप्रकरणी गिलानींना पदच्युत करण्यात आले. 2012 मध्ये राजा परवेझ अशरफ यांना 17वे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले.

 

शरीफ यांचे सत्तेत पुनरागमन, भ्रष्टाचारामुळे हटवले : 
>> 2013 च्या सर्वसाधारण निवडणुकीत शरीफ यांच्या पक्ष पीएमएल-नवाझने विजय मिळवला आणि चौथ्यांदा त्यांनी सत्ता स्थापन केली. तथापि, 2017 मध्ये पनामा पेपरगेटमध्ये नाव समोर आल्यानंतर त्यांना आपली खुर्ची सोडावी लागली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या वृत्ताशी संबंधित इन्फोग्राफिक्स... शेअर करायला विसरू नका...

बातम्या आणखी आहेत...