Home | International | Pakistan | List Of Things Considered Haram In Islam

इस्लाममध्ये या 5 गोष्टी आहेत हराम; तुम्हाला माहिती आहेत का?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 05, 2018, 10:28 AM IST

पाकिस्तानात अनुष्का शर्माचा चित्रपट परी बॅन करण्यात आला आहे.

 • List Of Things Considered Haram In Islam

  इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात अनुष्का शर्माचा चित्रपट परी बॅन करण्यात आला आहे. तेथील सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार त्याला काळी जादू प्रोमोट करण्यात आली. इस्लाममध्ये काळी जादू कदापी मान्य नाही. हा चित्रपट काळ्या जादूला प्रोमोट करणारा असल्याने त्याला पाकिस्तानात प्रदर्शनाची परवानगी दिली जाणार नाही. इस्लाममध्ये ब्लॅक मॅजिक हराम आहे. केवळ काळी जादूच नव्हे, तर दैनंदिन आयुष्यातील आणखी काही गोष्टी सुद्धा इस्लाममध्ये हराम मानल्या जातात.

  टॅटू
  इस्लाममध्ये मेंदी काढण्यास काहीच हरकत नाही. मात्र, परमानंट टॅटू या धर्मात हराम मानल्या जातो. जे लोक आपल्या शरीरावर कायमचे टॅटू गोंदवतात त्यांना अभिशाप मिळतो असे म्हटले जाते. सोबतच या धर्मात कुठल्याही बॉडी मॉडिफिकेशन अर्थात कृत्रिम सजावटींनाही हराम मानले जाते. यात उपचार वगळता कुठल्याही प्रकारे बॉडी मॉडीफाय करणे हराम आहे.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, इस्लाममध्ये हराम असलेल्या इतर 4 गोष्टी

 • List Of Things Considered Haram In Islam

  व्याज
  इस्लाममध्ये व्याज घेणे आणि देणे दोन्ही गोष्टी हराम आहेत. व्याजला रिबा असे म्हटले जाते. व्याजाचा व्यवहार करणे 36 दुष्कृत्य करणाइतके हीन आहे. व्याजाच्या व्यवहाराने गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होतो अशी इस्लामची शिकवण आहे. कुराण आणि हदीसमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. 

 • List Of Things Considered Haram In Islam

  पुरुषांनी दागिने घालणे
  इस्लाममध्ये पुरुषांनी सिल्कचे कपडे आणि दागिणे घालणे हराम आहे. ज्या वेशभूषा करून पुरुष महिलांचे अनुकरण करत असल्याचे वाटत असेल ते सर्व हराम आहे. पुरुषांनी एकवेळचे जेवण होईल याहून अधिक किमतीचे दागिणे घालण्याची सक्त मनाई आहे. 

 • List Of Things Considered Haram In Islam

  नाच, गाणे
  इस्लाममध्ये नाचणे आणि गाणे हराम आहे. मूळात कुठल्याही गोष्टीवर अधिक आनंद किंवा अधिक शोक व्यक्त करण्याची इस्लाम परवानगी देत नाही. यात एखाद्या प्रीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास जास्त शोक करू नये आणि आनंदाच्या प्रसंगी अती होईल असे आनंद साजरे करू नये अशीही शिकवण आहे.

 • List Of Things Considered Haram In Islam

  दारू, जुगार
  दारुचे सेवन करणे आणि जुगार खेळणे इस्लामनुसार एक गुन्हा आहे. अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांनी या दोन्ही गोष्टी प्रतिबंधित मानल्या आहेत. कुराणमध्ये याचा उल्लेख आहे. 

Trending