Home | International | Pakistan | Malala Returns To Hometown Mingora In Pakistan For First Time Since Shooting

6 वर्षांपूर्वी जेथे तालिबानचा हल्ला झाला, त्याच ठिकाणी पोहोचली मलाला युसूफझाई

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 31, 2018, 04:22 PM IST

6 वर्षांपूर्वी जेथे तालिबानचा हल्ला झाला, त्याच ठिकाणी पोहोचली मलाला युसूफझाई

 • Malala Returns To Hometown Mingora In Pakistan For First Time Since Shooting

  इस्लामाबाद - तालिबानी हल्ला झाल्याच्या 6 वर्षांनंतर प्रथमच मलाला पाकिस्तान दौऱ्यावर आहे. यात ती खैबर-पख्तूनख्वा प्रांतात स्वात जिल्ह्यातील मिंगोरा गावात पोहोचली आहे. याच ठिकाणी मलालाचे जुने घर होते. हीच ती जागा होती, ज्या ठिकाणी तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तासह तिला हेलिकॉप्टरने इस्लामाबादहून या गावात आणण्यात आले. लंडनमध्ये स्थायिक झालेली मलाला 2 एप्रिल पर्यंत पाकिस्तानातच राहणार आहे.

  काय म्हणाली...
  मलालाने पंतप्रधान कार्यालयातून एक भाषण केले. त्यामध्ये आपण नेहमीच पाकिस्तानातील घरी परतण्याचे स्वप्न पाहिले होते. तसेच मी पाकिस्तानात परत येईल तेव्हाचा पाकिस्तान शांत राहील हेही माझे स्वप्न होते. "मला रस्त्यांवर बेधडक कुणालाही न घाबरता फिरायचे आहे. आणि हो मी आज माझ्या घरी आले. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानते."

  11 वर्षांची असताना सुरू केली तालिबानविरोधी मोहिम
  - मलाला पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात एका मिंगोरा नामक गावात राहत होती. तिने वयाच्या 11 व्या वर्षी तालिबान विरोधात मोहिम सुरू केली.
  - तालिबानने स्त्री शिक्षणाला विरोध केला होता. दहशतवाद्यांचा विरोध झुगारून लावत तिने आपल्या गावात आणि जवळपासच्या परिसरात स्त्री शिक्षणासाठी मोहिम राबवली.
  - ऑक्टोबर 2012 मध्ये शाळेतून परत येत असताना मलालावर दहशतवादी हल्ला झाला. तिच्या डोक्यात गोळी लागली होती.
  - पाकिस्तानात उपचार शक्य नसल्याने तिला ब्रिटनच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याच ठिकाणी यशस्वी उपचारानंतर तिच्यासह कुटुंबियांनाही आश्रय देण्यात आला.
  - मलालाच्या धाडसाचे जगभर कौतुक झाले. स्त्री शिक्षणासाठी तिने जिवाची बाजी लावली होती. त्या निमित्त 2014 मध्ये भारताचे बालहक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी आणि मलाला यांना संयुक्तरित्या शांततेचा नोबेल प्रदान करण्यात आला.

 • Malala Returns To Hometown Mingora In Pakistan For First Time Since Shooting
 • Malala Returns To Hometown Mingora In Pakistan For First Time Since Shooting

Trending