आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला पोहचण्यापूर्वी नवाज म्हणाले, तुरुंगात टाकतील, पण मी पिढ्यांसाठी बलिदान देत राहील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री इशाक डार यांच्यासह कुटुंबातील लोक नवाज-मरियमला निरोप देण्यासाठी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर आले होते. 

 

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ शुक्रवारी ब्रिटनहून पाकमध्ये परततील. भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तपाससंस्था नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरो (नॅब) ने म्हटले की, एअरपोर्टवर उतरताच त्यांना अटक केली जाईळ. पंतप्रधान म्हणून ज्या हेलिकॉप्टरमधून ते देशाचा दौरा करायचे त्याच हेलिकॉप्टरमधून रावळपिंडीहून त्यांना अदियाला तुरुंगात नेले जाईल.  पाक पोहोचण्यापूर्वी नवाज म्हणाले, मला तुरुंगात टाकले जाईल, पण पाकिस्तानातील येणाऱ्या पिढ्यांसाठी बलिदान देत राहील.  


नवाज यांच्याबरोबर त्यांची कन्या मरीयमही येणार आहे. त्यांनाही या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार नवाज लाहौर किंवा इस्लामाबादपैकी कोणत्याही एअरपोर्टवर उतरू शकतात. त्यामुळे दोन हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले आहे. नवाज यांना त्यांच्या समर्थकांना भेटण्याआधी थेट तुरुंगात नेण्याची नॅबची इच्छा आहे. दुसरीकडे गुरुवारी रात्री नवाज यांचे दोन नातू जुनैद सफदर आणि झकारिया हुसैन यांना लंडनमध्ये अटक केली आहे. त्यांच्यावर एका आंदोलकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. जुनैद नवाजची मुलगी मरियम आणि जकारिया नवाजचा मुलगा हुसैन यांचा मुलगा आहे. 

 

आमच्यासाठी कठीण काळ 
नवाज आणि मरियम यांना मित्र आणि कुटुंबीयांनी हिथ्रो विमानतळावर निरोप दिला. मरियम यांना रवाना होण्यापूर्वी ट्वीट केले की, मी मुलांना या कठीण परिस्थितीचा सामना करण्यास सांगितले आहेत. पण मुले मुलेच असतात. निरोप घेणे कठीण असते. नवाज यांचा मुलगा हुसैन म्हणाला की, त्यांची आई कुलसुम यांनी एका महिन्याने डोळे उघडले. यापेक्षा जास्त मी बोलू शकत नाही. त्यांना आशिर्वादाची गरज आहे. कुलसुम यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. 


शरीफ कुटुंबाने खरेदी केले होते 4 फ्लॅट
कोर्टाने नवाज (68) यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर जवळपास 72 कोटींचा दंड ठोठावला आहे. तर मरियम (44) यांना 7 वर्षे तुरुंगात राहावे लागेल. तर 18 कोटी दंड द्यावा लागेल. त्यांचे पती सफदर (54) यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण लंडनच्या अॅव्हनफील्ड मधील 4 फ्लॅटशी संबंधित आहे. नवाज यांनी 1993 मध्ये हे फ्लॅट खरेदी केले होते. 

बातम्या आणखी आहेत...