Home | International | Pakistan | Pak Envoy put allegations on india in UN Again

UN मध्ये पाकने म्हटले, काश्मीरवर लवकर तोडगा निघावा, न्यायाशिवाय शांतता अशक्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 20, 2018, 01:42 PM IST

मलीहा लोधी आणि पाकिस्तानी शिष्टमंडळाने वारंवार संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर पाकिस्तानचा मुद्दा उचलून धरलेला आहे.

 • Pak Envoy put allegations on india in UN Again
  2017 मध्ये यूएनमध्ये पाकिस्तानी राजदूत मलीहा यांनी काश्मीरमध्ये भारत कशाप्रकारे अत्याचार करतो याचा चुकीचा फोटो सादर केला होता. (फाइल)

  - मलीहा लोधी म्हणाल्या, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने काश्मीरमध्ये त्यांचे प्रस्ताव पूर्णपणे सादर करावे.

  - काश्मीरमधील हिंसाचार आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन असे मुद्दे पाकिस्तानकडून उचलले जातात.

  न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या प्रस्तावांनुसार पॅलिस्टीनी आणि काश्मीर वाद सोडवणे गरजेचे आहे. न्यायाशिवाय शांतता शक्य नाही. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय शांतता विषयावरील चर्चेत त्यांनी हे मत मांडले.


  मानवी हक्क उल्लंघनावर पाकने व्यक्त केली आहे चिंता
  - मलिहा लोधी आणि पाकिस्तानी शिष्टमंडळाने नेहमीच संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
  - या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानचे सदस्य मसूद अन्वर यांनी संयुक्त संयुक्त राष्ट्रांच्या सूचना समितीला संबोधित करताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. तेथील नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

  भारताने फेटाळले पाकचे आरोप
  भारता मसूद यांचा मुद्दा फेटाळत म्हटले की, संयुक्त राष्ट्राच्या कामाशी त्यांचा मुद्दा सुसंगत नाही. पाकिस्तान, संयुक्त राष्ट्र सूचना समितीचा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय शिष्टमंडळातील श्रीनिवास प्रसाद म्हणाले होते की, भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात आहे.


  दाखवला होता खोटा फोटो
  संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी एखा जखमी मुलीचा फोटो दाखवत ती काश्मीरच्या पॅलेट गनची शिकार ठरली असल्याचे म्हटले होते. पण प्रत्यक्षात ती पॅलस्टीनची तरुणी होती. भारताकडून उत्तर देताना भारताच्या सर्वात ज्युनियर डिप्लोमॅट पॉलोमी त्रिपाठी यांनी म्हटले होते की, लोधी यांनी खोटा फोटो दाखवून सभेची दिशाभूल केली आणि भारताविरोधात खोटे आरोप केले.

 • Pak Envoy put allegations on india in UN Again

Trending