आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज स्वतः निवडणूक लढवणार नाही, 200 जागांवर दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचे उमेदवार उतरवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाफिज सईद त्याचे 200 उमेदवार निवडणुकीत उतरवणार आहे. - Divya Marathi
हाफिज सईद त्याचे 200 उमेदवार निवडणुकीत उतरवणार आहे.

लाहोर - पाकिस्तानमध्ये 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 26/11 मुंबई हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाफिज सईद या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी होणार नसला तरी त्याच्या संघटनेचे 200 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. लष्कर-ए-तोएबाशी संबंधीत दहशतवादी संघटना जमात-उद-दावाने मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. हाफिज सईदच्या पक्षाला निवडणूक आयोगाने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सईद आता त्याचे उमेदवार अल्लाह-हू-अकबर तहरीक (एएटी) या राजकीय पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. हाफिज सईद हा जमात-उद-दावाचा प्रमुख आहे. त्यासोबतच लष्कर-ए-तोएबाचा को-फाऊंडर देखील आहे. 

 

अल्लाह-हू-अकबर तहरीक पक्षाकडून लढणार निवडणूक 
- पाकिस्तान निवडणूक आयोगाने सईदच्या एमएमएल पक्षाला अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सईद त्याच्या उमेदवारांना अल्लाह-हू-अकबर तहरीक (एएटी) पक्षाकडून मैदानात उतरवणार आहे. 
- जमात-उद-दावाचा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले असून ते एएटीच्या वतीने उमेदवारी दाखल करणार आहेत. 

 

2017 मध्ये अस्तित्वात आला सईदचा पक्ष  
- जमात-उद-दावाने 2017 मध्ये मिल्ली मुस्लिम लीग पक्षाची स्थापना केली. सईदला 30 जानेवारी रोजी लाहोरमधून अटक करण्यात आली होती. 
- हाफिज आणि त्याचे चार साथीदार अब्दुल्ला उबेद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद आणि काजी काशिफ हुसैन यांना त्यांच्या घरी नजरकैद करण्यात आले होते. 
- हाफिजला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्यावर 1 कोटी डॉलरचा इनाम जाहीर केला आहे. 

 

31 मे रोजी संपला सरकारचा कार्यकाळ 
- पाकिस्तानमधील विद्यमान सरकारचा कार्यकाळ 31 मे रोजी पूर्ण झाला आहे. सध्या माजी सरन्यायाधीश नसीरुल मुल्क यांना प्रभारी पंतप्रधान नियुक्त करण्यात आलेले आहे. 
- पाकिस्तानच्या संविधानानुसार सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर 60 दिवसांमध्ये निवडणूक घ्यावी लागते. 

बातम्या आणखी आहेत...