Home | International | Pakistan | Pakistan Foreign Minister Khawaja Asif Salman Khan Muslim Sentence

सलमान खान अल्पसंख्याक, त्यामुळेच त्याला कडक शिक्षा: पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 10:08 AM IST

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सलमान खानला झालेल्या शिक्षेवरुन मुक्ताफळे उधळली आहेत.

 • Pakistan Foreign Minister Khawaja Asif Salman Khan Muslim Sentence

  इस्लामाबाद - पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सलमान खानला झालेल्या शिक्षेवरुन मुक्ताफळे उधळली आहेत. पाकचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, सलमानला 5 वर्षांची शिक्षा झाली, कारण तो अल्पसंख्याक (मुस्लिम) समाजाचा आहे. भारतातील भेदभाव यातून दिसून येतो.

  जिओ न्यूजच्या 'शो कॅपिटल'ला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले, 'ज्या समाजाची भारतात सत्ता आहे त्या समाजाचा सलमान असता तर कदाचित त्याला एवढी कडक शिक्षा झाली नसती, कोर्टाने त्याचा सहानुभूतीपुर्वक विचार केला असता.'

  त्यांनी त्यांच्या देशाची काळजी करावी..
  - पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी त्यांचा समाचार घेतला. ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या देशाची काळजी करावी, भारतात लुडबूड करु नये, असे नकवी म्हणाले.
  - दुसरीकडे सोशल मीडियावरुनही ख्वाजा यांच्या मुक्ताफळांचा समाचार घेण्यात आला.
  - एका व्यक्तीने म्हटले, की सैफ अली खानला सोडण्यात आले आहे, तो काय हिंदू होता का?
  - एका सोशल मीडिया यूजरने विचारले- संजय दत्तबद्दल काय म्हणाल? त्याला 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा झाली होती. एका विदेश मंत्र्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नाही.

 • Pakistan Foreign Minister Khawaja Asif Salman Khan Muslim Sentence

Trending